Hemant Soren Arrested Dainik Gomantak
देश

Hemant Soren Arrested: हेमंत सोरेन यांना अटक, अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीची मोठी कारवाई

Hemant Soren Arrested: ईडीने बुधवारी हेमंत सोरेनला अटक केली. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर हेमंत यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Manish Jadhav

Hemant Soren Arrested: रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी हेमंत सोरेन यांना अटक केली. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर हेमंत यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला. हेमंत यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच, महाआघाडीने 43 आमदारांसह नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. इथे हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर, ईडीने त्यांना अटक केली आणि त्यांच्या कार्यालयात नेले. तत्पूर्वी, हेमंत सोरेन रात्री साडेआठच्या सुमारास राजभवनात पोहोचले होते. त्यापूर्वी सोरेन यांनी रात्री आठ वाजता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची भेट घेतली. यानंतर चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्यानंतर आता चंपई सोरेन राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील.

तत्पूर्वी, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास सहाय्यक संचालक देवव्रत झा यांच्या नेतृत्वाखाली ईडीचे पथक तिथे पोहोचले होते. माहितीनुसार, ईडीने हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापेमारी दरम्यान सापडलेल्या 36 लाख रुपयांच्या स्त्रोताबाबत माहिती मागवली. दिल्लीतील निवासस्थानावर छापेमारी दरम्यान, जमीन घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांव्यतिरिक्त एजन्सीला गुंतवणुकीशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली. ईडीनेही या सर्व कागदपत्रांची चौकशी केली. एजन्सीने हेमंत यांना 28-29 जानेवारीच्या रात्रीच्या त्यांच्या हालचालींबद्दलही विचारले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची सुमारे साडेसहा तास चौकशी केली आणि नंतर त्यांना जमीन घोटाळ्यातील आरोपी बनवून अटक केली. जेएमएमचे खासदार महुआ माझी यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बडगई येथील 8.46 एकर जमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांच्याकडे उत्तर मागितले आहे. हेमंत सोरेन यांनी यापूर्वी ईडीला लिहिलेल्या पत्रात या जमीनीचा उल्लेख केला होता. तसेच, गेल्या पाच दशकांपासून ही जमीन पाहन कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कुटुंबांच्या मालकीची जमीन आणि त्यावरील त्यांचा ताबा यासंबंधीचे पुरावे दाखवले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सीओ आणि अटक केलेल्या झोनल महसूल उपनिरीक्षकाच्या वक्तव्याचाही हवाला दिला.

राजकीय वातावरण तापले, सीएस-डीजीपीही आले

हेमंत सोरेन यांच्या चौकशीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. चौकशीदरम्यानच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश कुमार यांना हटवण्यात आले. संध्याकाळी उशिरा मुख्य सचिव एल ख्यांगटे, डीजीपी अजय कुमार सिंग, डीजी सीआयडी अनुराग गुप्ता आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान सत्ताधारी आघाडीचे आमदारही मुख्यमंत्री भवनात तळ ठोकून होते. हेमंत सोरेन यांना कोठडीत ठेवण्यासाठी दीनदयाल नगरमध्ये कॅम्प जेल बांधण्यात आले.

चंपई 12 वे मुख्यमंत्री असतील

जमीन घोटाळ्यात हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर चंपाई सोरेन झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. चंपई सोरेन हेमंत सरकारमध्ये परिवहन आणि कल्याण मंत्री होते. हेमंत सोरेन यांच्या अटकेची माहिती मिळताच महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि चंपई सोरेन यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर हेमंत सोरेन यांच्यासह महाआघाडीच्या सर्व आमदारांनी राजभवन गाठले. आघाडीत सहभागी पक्षांनी बहुमताचा आकडा राखून सरकार स्थापनेचा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

SCROLL FOR NEXT