Uttarakhand Helicopter Accident  X
देश

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथजवळ मोठा अपघात! जंगलात कोसळले हेलिकॉप्टर; सात जणांचा मृत्यू

Uttarakhand Helicopter Accident: उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट प्राधिकरणानुसार (UCADA), हे हेलिकॉप्टर केदारनाथहून सकाळी सुमारे ५.३० वाजता रवाना झाले होते.

Sameer Panditrao

उत्तराखंड: उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे रविवारी सकाळी एका खासगी हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारघाटीतील गौरीकुंड व त्रिजुगी नारायण यामधील जंगलात कोसळून आगीच्या भक्षस्थानी गेले.

उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट प्राधिकरणानुसार (UCADA), हे हेलिकॉप्टर केदारनाथहून सकाळी सुमारे ५.३० वाजता रवाना झाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याचा अपघात झाला. खराब हवामानामुळे दुर्घटना घडली असावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंग रजवार यांनी सांगितले. गढवाल रेंजचे पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांनी या दुर्घटनेबाबत दुजोरा दिला आहे

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या सोशल मीडिया 'एक्स'वर या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हेलिकॉप्टर अपघाताबाबत अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. SDRF, स्थानिक प्रशासन व इतर बचाव पथके मदत व बचाव कार्यात व्यस्त आहेत. सर्व प्रवाशांचे जीवन सुरक्षित राहावे, अशी मी बाबा केदारचरणी प्रार्थना करतो."

याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्रीधामकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर, ७ जून रोजी केदारनाथकडे निघालेले दुसरे एक हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पडले होते. त्या वेळी वैमानिक जखमी झाला होता, पण सर्व पाच यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

या अपघातांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री धामी यांनी उत्तराखंडातील हेलिकॉप्टर सेवा संचालनासाठी कठोर दिशा-निर्देश जारी केले आहेत. त्यांनी सांगितले की, प्रत्येक हेलिकॉप्टर उड्डाणाआधी विमानाची सखोल तांत्रिक तपासणी आणि अचूक हवामान माहिती मिळवणे बंधनकारक असेल, अशा स्वरूपातील एक सखोल 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर' (SOP) तयार करण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT