Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Video: जन्नत काळजात घुसली, अरब Influencer कश्मीरच्या सौंदर्याने वेडावला; म्हणाला...

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे दरम्यान G-20 ची बैठक होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी सध्या भारतात आहेत.

अरब इंफ्लुएन्सर अमजद ताहाही आला आहे. सध्या तो काश्मीरच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहे. यातच, त्याने व्हिडीओ ट्विट करत काश्मीरचे तोंड भरुन कौतुक केले.

त्याने यावेळी काश्मीरचे वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असे केले. त्याने लिहिले की, "हे स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रिया नाही तर काश्मीर आहे. ते पृथ्वीवरील स्वर्ग आहे."

दरम्यान त्याने पुढे लिहिले की, "हे स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रिया नाही. हा भारत आहे. हे काश्मीर आहे, जिथे G20 ची बैठक होणार आहे. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग का म्हणतात याची मला प्रचिती इथे आल्यानंतर आली.

हे ठिकाण हवामान बदलावर उपाय असू शकते. त्याने पुढे लिहिले की, "इथे सर्व धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात."

दुसरीकडे, भारताच्या (India) अध्यक्षतेखाली G20 पर्यटन कार्यगटाची तिसरी बैठक 22 ते 24 मे दरम्यान जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे होणार आहे.

यापूर्वी, पंजाबी गायक यो यो हनी सिंगने प्रथमच प्रतिष्ठित G20 बैठक आयोजित केल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे (Jammu And Kashmir) कौतुक केले होते. तो म्हणाले होता की, "मला कळले की, यावेळी G20 शिखर परिषद काश्मीरमध्ये होत आहे.

याशिवाय गोवा आणि इतर काही ठिकाणीही ही परिषद होत आहे. मी खूप उत्साहित आहे. मी सध्या अमेरिकेत आहे. मला काश्मीरमधील G20 शिखर परिषदेबद्दल जाणून घ्यायचे आहे."

तो पुढे म्हणाला होता की, "काश्मीर हे स्वर्ग आहे. मी लहानपणी काश्मीरला गेलो होतो, मला पुन्हा काश्मीरला जायचे आहे. पुढच्या वेळी मी लवकरच काश्मीरला भेट देईन."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT