haryana 4 children die by drowning in a pond on the day of holi in palwal  Dainik Gomantak
देश

होळीच्या दिवशी तलावात बुडून 4 मुलांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

हरियाणातील पलवल जिल्ह्यातील भिडुकी गावात होळीच्या दिवशी चार मुलांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पलवल जिल्ह्यातील भिडुकी गावात असलेल्या सिद्ध दास बाबा मंदिराच्या तलावात होळीच्या दिवशी आंघोळ करताना 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला. चारही मुले 12 ते 14 वयोगटातील होती. या घटनेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

होळी (holi) खेळल्यानंतर चारही मुले या तलावात आंघोळीसाठी गेली असता चौघांचाही खोल पाण्यात बुडून मृत्यू (death) झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता.

हर्षित (14वर्षे) मुलगा जगदीश, नमन (12वर्षे), मुलगा जगदीश, भोला (13वर्षे) मुलगा मनोज आणि राज मुलगा सुभाष अशी मृत मुलांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

हसनपूर पोलीस (police) ठाण्याचे एसएचओ म्हणाले की, त्यांच्यासोबत आणखी कोणते बालक बुडाले आहे का, याचा पोलीस अद्याप तलावात शोध घेत आहेत. त्यासाठी तलाव रिकामे करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

Goa Today's News Live: मायलेकीवर लैंगिक अत्याचार, असोल्डा येथील एकास अटक

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

SCROLL FOR NEXT