IPL 2025 Dainik Gomantak
देश

IPL 2025: फक्त 2 विकेट... हर्षल पटेल बनणार टी-20 चा बादशहा, बुमराहसह 11 गोलंदाजांना पछाडणार

Harshal Patel in IPL 2025: हर्षल पटेल आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या जवळ आहे. यासाठी हर्षलला दिल्लीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात २ विकेट घ्याव्या लागतील.

Sameer Amunekar

इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या हंगामात हैदराबाद संघ संघर्ष करताना दिसत आहे. पॅट कमिन्सच्या संघाचे १० सामन्यांत फक्त ६ गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहेत. संघाने आतापर्यंत फक्त ३ सामने जिंकले आहेत.

आता एसआरएच त्यांचा चौथा विजय मिळविण्याच्या उद्देशाने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध खेळेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर असतील, ज्याला आयपीएलमध्ये मोठी कामगिरी करण्याची संधी असेल.

हर्षल पटेल २०१२ पासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. आतापर्यंत त्याने ४ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये एसआरएचकडून खेळताना हर्षलने ९ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.

आता त्याचा प्रयत्न दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेंडूने चमत्कार करण्याचा असेल. जर हर्षलने दिल्लीच्या २ फलंदाजांना बळी घेतले तर तो आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करेल आणि हरभजन सिंगची बरोबरी करेल. अशी कामगिरी करणारा तो फक्त १३ वा गोलंदाज ठरेल.

हर्षल आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाजही बनेल. आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने १०५ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर, युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर आहे.

चहलने ११८ आयपीएल सामन्यांमध्ये १५० बळींचा टप्पा गाठला होता. सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून रशीद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे तर जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. आता हर्षलकडे चहल, रशीद खान आणि बुमराह सारख्या ११ गोलंदाजांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे.

हर्षल पटेलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ११५ सामन्यांच्या ११२ डावात १४८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये चार वेळा ४ विकेट्स आणि एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT