Crime News  Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: आधी उपभोग घेतला नंतर गळा कापला...! अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं उत्तरप्रदेश हादरलं

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: कपडे विखुरले होते, अंगावर जखमा होत्या आणि आजूबाजूला रक्त सांडलेले होते… हरदोईच्या जंगलात मुलीवर झालेला क्रूरपणा पाहून उत्तर प्रदेश हादरले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी ही बलात्कार आणि खुनाची घटना असल्याचे दिसते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, ही घटना पाचदेवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. त्याचवेळी मुलीच्या (Girl) मृत्यूची बातमी आजूबाजूच्या परिसरात आगीसारखी पसरली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातून फॉरेन्सिक टीमही आली आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस अधीक्षकही घटनेची माहिती घेण्यासाठी गेले होते.

घटना हृदयद्रावक आहे, एसपी म्हणाले - आरोपींना सोडले जाणार नाही

राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आणि ते सोबत घेतले. काही जणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले आहे. घटना हृदयद्रावक आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या आरोपींना सोडले जाणार नाही.

पोलिसांचे (Police) पथक त्याची ओळख पटवण्यात गुंतले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकत होती. दुसरीकडे या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना कोणी घडवली आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT