गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून राजीनामा दिल्याची माहिती दिली. (Hardik Patel resigns from Congress membership)
त्यांनी लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मी भविष्यात गुजरातसाठी (Gujarat) सकारात्मक पद्धतीने काम करू शकेन, असे ट्विट पटेल यांनी लिहिले आहे.
गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. अशा स्थितीत हार्दिक यांचा कॉंग्रेसला रामराम ठोकणे महागात पडू शकते. गुजरात काँग्रेसमधील कलह थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हार्दिक पटेलच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे ते पक्षावर नाराज असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान चिंतन शिबिरात सहभागी न झाल्याने हार्दिक यांची पक्षाप्रती असलेली नाराजी लपून राहिली नव्हती. अखरे त्यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यातही त्यांनी हार्दिक पटेल यांची वैयक्तिक भेट घेतली नव्हती.
हार्दिक पक्षावर का नाराज होता?
खरं म्हणजे काँग्रेसने हार्दिक यांना कार्याध्यक्ष बनवले होते, पण त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. निवडणुका पाहता त्यांना काय करायचे हेही सांगण्यात आले नव्हते. राज्यात पक्षाचा कोणता कार्यक्रम सुरू आहे, याची माहितीही त्यांना दिली जात नव्हती, याशिवाय काँग्रेसच्या अनेक पोस्टर्समध्येही त्यांना स्थान दिले नव्हते, असेच काहीसे मुद्दे हार्दिक यांना खटकत होते,म्हणून त्यांनी आज काँग्रेसला कायमचा रामराम ठोकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.