Hardik Pandya Video Dainik Gomantak
देश

VIDEO: भाड़ में जा... चाहत्याकडून हार्दिक पांड्याला शिवीगाळ, रेस्टॉरंटबाहेर नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

Hardik Pandya Video: भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Sameer Amunekar

भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका रेस्टॉरंटबाहेर सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. मात्र, घाईत असलेल्या हार्दिकने अधिक सेल्फी देण्यास नकार देताच, एका चाहत्याचा संयम सुटला आणि त्याने हार्दिकला चक्क "भाड में जा" असे सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या त्याची मैत्रीण माहिका शर्मासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. जेवण करून बाहेर पडल्यानंतर हार्दिकने आधी माहिकाला गाडीत सुरक्षितपणे बसवले. त्यानंतर बाहेर थांबलेल्या काही चाहत्यांसोबत त्याने सुरुवातीला सेल्फी क्लिक केले. मात्र, चाहत्यांची संख्या वाढतच गेली आणि हार्दिकला तेथून निघायचे होते.

जेव्हा एका चाहत्याने पुन्हा सेल्फीसाठी विनंती केली, तेव्हा हार्दिक म्हणाला, "अरे, आतापर्यंत खूप सेल्फी झाल्या आहेत, आता बस." हार्दिकचे हे उत्तर ऐकून संतापलेल्या चाहत्याने भररस्त्यात त्याच्यावर ओरडत अपशब्द वापरले. हार्दिकने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जाणे पसंत केले.

दमदार पुनरागमन

एकीकडे वैयक्तिक आयुष्यातील वादाच्या ठिणग्या पडत असताना, हार्दिकची बॅट मात्र मैदानात आग ओकत आहे. आशिया चषक २०२५ मध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत झंझावाती पुनरागमन केले.

मालिकेतील पहिल्या सामन्यात ५९ धावा आणि एक बळी घेत त्याने आपली लय सिद्ध केली. तर पाचव्या टी-२० सामन्यात अवघ्या २५ चेंडूत ६३ धावांची आतषबाजी करत त्याने 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचा गुलाल उधळला.

टी-२० क्रिकेटमधील अनोखा विक्रम

हार्दिक पांड्या आता भारतीय टी-२० संघाचा कणा बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने ४ सामन्यांत १५६ धावा आणि ३ बळी मिळवले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २,००० धावा आणि १०० हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या नावावर आता २००२ धावा आणि १०१ बळींची नोंद आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात हार्दिकची पकड मजबूत असून आगामी विश्वचषकासाठी तो टीम इंडियाची मोठी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

"मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

गोमंतकीय मातीतलं 'ख्रिस्तपुराण'! जेव्हा येशूची जन्मकथा ओवीबद्ध मराठीत अवतरली...

SCROLL FOR NEXT