Har Ghar Tiranga |
Har Ghar Tiranga | Dainik Gomantak
देश

Har Ghar Tiranga: आजपासुन घरोघरी तिरंगा,नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाची तयारी जोरात सुरू असून ती आता अंतिम स्वरुपात आली आहे. दरम्यान, 'हर घर तिरंगा अभियान' (Har Ghar Tiranga) आजपासून सुरू होणार आहे. आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवत आहे. आजपासून लोक आपापल्या घरांवर आणि प्रतिष्ठानांवर तिरंगा ध्वज फडकवतील.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत, सरकारने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व लोकांना त्यांच्या घरावर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. 'हर घर तिरंगा' मोहिमेत टपाल विभागही राष्ट्रध्वजाची विक्री करून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

'हर घर तिरंगा' मोहीम आजपासून सुरू

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत तिरंगा मोहीम आजपासून सुरू झाला आहे. ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने, 'हर घर तिरंगा' मोहीम लोकांना घरोघरी तिरंगा घेऊन जाण्यासाठी आणि फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणारी, आजपासून सुरू होणार आहे.

असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते

राष्ट्रीय वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आधीच आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सर्व लोकांना घरोघरी तिरंगा (Tiranga) लावण्याचे आवाहन केले होते.

तिरंगा कधी फडकवता येईल?

'हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवल्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोकांना त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.

तिरंगा फडकवताना या गोष्टी लक्षात ठेवा

नागरिकांना 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावता येणार आहे.

ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा, झेंड्याची लांबी रुंदीचे प्रमाण - 3*2 असावे.

कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या आयताकार असावा.

अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.

कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.

घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.

राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT