Happy Birthday PM Modi: BJP's 'Service and Dedication Campaign' and Congress 'National Unemployment Day' Dainik Gomantak
देश

Happy Birthday PM Modi: भाजपची 'सेवा आणि समर्पण मोहीम' तर 'काँग्रेसचा राष्ट्रीय बेरोजगारी दिवस'

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday PM Modi), सरकारने दोन कोटी लोकांना लसीकरण (Vaccination) करण्याचे लक्ष्य देखील ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजप (BJP) देशात आजपासून पुढील 20 दिवस सेवा आणि समर्पण मोहीम राबवणार आहे (Seva & Samarpan) . दुसरीकडे, युवक काँग्रेस (Youth Congress) या दिवसाच्या निषेधार्थ 'बेरोजगारी दिवस'(Unemployment Day) साजरा करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday PM Modi), सरकारने दोन कोटी लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य देखील ठेवले आहे.(Happy Birthday PM Modi: BJP's 'Service and Dedication Campaign' and Congress 'National Unemployment Day')

7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या "सार्वजनिक सेवेची दोन दशके" पूर्ण होत आहेत. त्यामुळे 20 दिवसांची 'सेवा आणि समर्पण' मोहीम भाजपकडून केली जाईल . मोदी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदावर असताना 7 ऑक्टोबर रोजी 20 वर्षे पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हा कार्यक्रम 20 दिवस चालणार आहे. 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती , तेव्हापासून मोदी सतत संवैधानिक पदावर आहेत.

आज, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त, भाजप कार्यकर्ते देशभरात एक विशेष मोहीम राबवतील जेणेकरून अधिकाधिक लोकांना कोरोना विरोधी लसीसाठी प्रेरित केले जाईल जेणेकरून एका दिवसात लसीकरणाचे सर्व जुने रेकॉर्ड मागे राहतील. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील पक्षाचे बूथ स्तरावरील कार्यकर्ते लोकांना लसीकरणात मदत करतील.

युवक काँग्रेस आज 'राष्ट्रीय बेरोजगारी दिवस' साजरा करणार

काँग्रेसची युवा आघाडी आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'राष्ट्रीय बेरोजगारी दिवस' साजरा करणार आहे. भारतीय युवक काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'राष्ट्रीय बेरोजगारी दिन' अंतर्गत, संघटनेद्वारे देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले की, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे मोठे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु आज केंद्र सरकार रोजगाराच्या मुद्द्यावर पूर्णपणे गप्प आहे. देशातील बेरोजगारीचा दर एका वर्षात 2.4 टक्क्यांवरून 10.3 टक्क्यांवर गेला आहे. सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT