Crane Accident in gwalior Dainik Gomantak
देश

Video: तिरंगा चढवताना क्रेन कोसळली; 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Gwalior: अपघातामुळे घटनास्थळी पोहचलेले महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त मुकुल गुप्ता यांना संतप्त जमावाने धक्का बुक्की देखील केली आहे.

दैनिक गोमन्तक

स्वातंत्र्य दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अनुशंगाने मध्य प्रदेशमध्येही कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. ग्वाल्हेरच्या महाराज बाडा येथील महापालिका कार्यालयात शनिवारी राष्ट्रध्वज लावण्यात आला. पण ज्या हायड्रोलिक मशीनवर तिरंगा चढवला जात होता, तो तुटला आणि तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. (Three workers were killed when a crane collapsed while hoisting a tricolor in Gwalior)

अपघातामुळे घटनास्थळी पोहचलेले महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त मुकुल गुप्ता यांना संतप्त जमावाने धक्का बुक्की देखील केली आहे. अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने गोंधळ सुरु केला, त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करावी लागली आणि पोलिसांनीच महामंडळाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली.

घटनेची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस आणि महापालिका आयुक्त मुकुल गुप्ता यांच्यासह ग्वाल्हेरला आलेले मंत्री तुलसी सिलावटही पोहोचले. सिलावट यांनी अपघाताची चौकशी केली आणि त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांशी बोलून त्यांचे सांत्वन केले.

महाराजा बडाच्या ऐतिहासिक इमारतीला दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सजवले जाते. राष्ट्रध्वज लावण्यासाठी हायड्रॉलिक मशीन मागवण्यात आली होती. मशीनच्या मदतीने काही कामगार इमारतीवर तिरंगा लावण्यासाठी चढले असताना हा अपघात झाला. यामध्ये महामंडळाचे कर्मचारी मंजर आलम, कुलदीप दंडौटिया आणि विनोद दंडौटिया आणि विनोद यांचा जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT