S. Jayshankar Dainik Gomantak
देश

Gurpatwant Singh Pannun Case: पन्नू प्रकरणात अमेरिकेन राजदूताच्या 'रेड लाइन'च्या वक्तव्यावर जयशंकर स्पष्टच बोलले; म्हणाले...

US Ambassador's Statement in Pannu Case: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी अलीकडेच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या कथित हत्येच्या खटल्याबबाबत वक्तव्य केले होते.

Manish Jadhav

Jaishankar on US Ambassador's Statement in Pannu Case: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी अलीकडेच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या कथित हत्येच्या खटल्याबबाबत वक्तव्य केले होते. याच्या तपासात अमेरिका आणि भारत एकत्र काम करत आहेत, असे ते म्हणाले होते. यासोबतच रेड लाइन ओलांडू नये आणि परदेशी नागरिकाच्या हत्येच्या प्रयत्नात कोणत्याही देशाचा किंवा कोणत्याही देशाच्या नागरिकाचा सहभाग मान्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी, आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे यासंदर्भात वक्तव्य आले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जयशंकर म्हणाले की राजदूत म्हणून गार्सेटी जे बोलतात किंवा विचार करतात ते त्यांच्या सरकारची भूमिका दर्शवतात. याबाबत आमची भूमिका वेगळी आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, या प्रकरणी आमच्या सरकारची भूमिका अशी आहे की, आम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली असून आम्ही तपास करत आहोत. गार्सेटी यांनी म्हटले होते की, कोणतेही सरकार किंवा त्या देशाचा नागरिक आपल्याच नागरिकाच्या हत्येत सहभागी होऊ शकत नाही. ही 'रेड लाइन' आहे जी अजिबात स्वीकारता येणार नाही.

'कच्चातिवू बेटासाठी काँग्रेस जबाबदार'

याशिवाय, जयशंकर यांनी कच्चातिवू बेटाबद्दलही सविस्तर सांगितले. हे 1958 आणि 1960 मध्ये घडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात मुख्य लोकांची इच्छा होती की, आपल्याला कमीत-कमी मासेमारी करण्याची परवानगी देण्यात यावी. मात्र, भारताने 1974 मध्ये हे बेट आणि 1976 मध्ये मासेमारीचे हक्क गमावले गेले. तत्कालीन सरकार आणि देशाच्या पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले नाही. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, जवाहरलाल नेहरु 1961 मध्ये म्हणाले होते की, मी या छोट्याशा बेटाला महत्त्व देत नाही आणि त्यावरील भारताचा दावा सोडण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच असणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT