Kutch Khavda Solar Park Fatal Road Accident Dainik Gomantak
देश

Accident News: सोलर पार्कचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! ट्रेलर आणि बोलेरोची जोरदार टक्कर; 7 जणांचा जागीच मृत्यू

Kutch Khavda Solar Park Fatal Road Accident: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली. कच्छमधील खावडा सोलर पार्क परिसराजवळ एका भीषण अपघातात 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Kutch Khavda Solar Park Fatal Road Accident: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली. कच्छमधील खावडा सोलर पार्क परिसराजवळ एका भीषण अपघातात 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. खावडा पोलीस चेकपोस्टकडून सोलर पार्कच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव ट्रेलर आणि कामगारांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो यांच्यात जोरदार टक्कर झाली. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, बोलेरोमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघात झाला त्यावेळी बोलेरोमधून 15 हून अधिक कामगार प्रवास करत होते. या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच हाहारकार उडाला. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले, तर मृतदेह खावडा येथे आणल्यानंतर पुढील पोस्टमार्टम प्रक्रियेसाठी भुज येथे पाठवण्यात आले. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरु केला.

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या (Gujrat) भावनगर जिल्ह्यातही असाच एक जीवघेणा अपघात घडला. भावनगर-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गावर तळाजा तालुक्यातील त्रापाज गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रेलरवर भरधाव वेगातील बोलेरो मागून धडकली. त्या दुर्घटनेतही बोलेरोमधील सात कामगार जागीच ठार झाले. हे सर्व कामगार भावनगरहून अलंग येथील एका शिपयार्डमध्ये कामासाठी निघाले होते. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा रस्ते अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: रंग त्याचा वेगळा...

कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 'Kia Carnival'वर तब्बल 1.70 लाखांपर्यंत डिस्काउंट; एक्सचेंज, स्क्रॅपेज ऑफरमधूनही होणार मोठी बचत

Nana Patekar Speech: 'हक्कांसाठी झगडा, भीक मागू नका, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा'; नानांचा विद्यार्थ्यांना दिलेला कानमंत्र चर्चेत

IND VS PAK: क्रिकेट फॅन्ससाठी डबल सेलिब्रेशन! दिवाळीच्या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज महामुकाबला!

Nana Patekar Memories: हरणाच्या चामड्याचा ढोल अन् नानांची गोष्ट ऐकून स्तब्ध झालेले श्रोते; 'नटसम्राटा'च्या हळव्या मनाचा अविस्मरणीय किस्सा!

SCROLL FOR NEXT