Gujarat Riots 2002 Dainik Gomantak
देश

Gujarat Riots 2002: नरोडा गाम दंगल! माजी मंत्री माया कोडनानीसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

2002 मध्ये झालेल्या या दंगलींमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat Riots 2002: गुजरातमधील नरोडा गाव (गाम) दंगलीप्रकरणी विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. गुरुवार, 20 एप्रिल रोजी एसआयटी प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश एसके बक्षी यांच्या न्यायालयाने 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

21 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. 2002 मध्ये झालेल्या या दंगलींमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता.

नरोडा गाम दंगलप्रकरणी तपासाच्या आधारे पोलिसांनी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह 86 जणांवर आरोप केले होते. या 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

2002 मध्ये गोध्रामध्ये चालत्या ट्रेनला आग लागली होती. या अपघातात 58 जणांचा मृत्यू झाला होता. गोध्रा घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान अहमदाबादच्या नरोडा गावामध्ये जातीय हिंसाचार पसरला होता.

यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या प्रकरणात एसआयटीचा तपास सुरू झाला आणि या प्रकरणात एसआयटीने माया कोडनानी यांना मुख्य आरोपी बनवले. माया कोडनानी या राज्य सरकारमध्ये माजी मंत्री राहिल्या आहेत.

नरोडा गाव हत्याकांड प्रकरणी आरोपींवर आयपीसी कलम 302 खून, 307 हत्येचा प्रयत्न, 143, 147 दंगल, 148, 129 बी, 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी कोडनानी यांना नरोडा पाटिया दंगल प्रकरणी विशेष न्यायालयाने 28 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर उच्च न्यायालयाने कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली.

2009 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात 187 जणांची चौकशी करण्यात आली, तर 57 प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी 13 वर्षे सुरू होती. सप्टेंबर 2017 मध्ये अमित शहा माया कोडनानीच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून हजर झाले. माया कोडनानी या दंगलीच्या वेळी गुजरातच्या मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या.

माया कोडनानी यांच्यावर गोध्रा हत्याकांडामुळे संतप्त झालेल्या हजारो लोकांच्या जमावाला नरोडा गावातील मुस्लिमांना मारण्यासाठी भडकवल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात 11 जणांना जीव गमवावा लागला होता आणि 82 जणांना आरोपी बनवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT