Arrested Dainik Gomantak
देश

Gujarat Crime: लग्नाचे आमिष दाखवून 15 हून अधिक तरुणींवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड; दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवायचा!

Online Dating Sscam: लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

Gujarat Man Arrested for Exploiting Women Through Matrimonial Sites

Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या अडीच वर्षात मॅट्रिमोनियल साईटवर भेटलेल्या 15 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचारा केल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. हिमांशू योगेशभाई पांचाळ असे या आरोपीचे नाव असून तो अहमदाबाद येथील रहिवासी आहे. दिल्ली गुन्हे शाखेचे सायबर सुरक्षा विभागाशी संलग्न अधिकारी असल्याचे भासवून त्याने आपले बनावट प्रोफाइल तयार केले होते.

श्रीमंत व्यक्ती असल्याचे भासवले

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पांचाळने आपल्या बनावट प्रोफाइलमध्ये आपण अनेक मोठ्या मालमत्तेचा मालक असून श्रीमंत व्यक्ती असल्याचे दाखवले होते, ज्यामुळे त्याच्या जाळ्यात अनेक महिला अडकल्या. तो मॅट्रिमोनियल साईटवर तरुणींशी संपर्क साधायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांना वसई, मुंबई आणि अहमदाबाद येथील हॉटेल्समध्ये बोलवायचा. या भेटींमध्ये तो त्यांना लग्नाचे आश्वासन द्यायचा, त्यांना बनावट हिऱ्यांचे दागिने भेट द्यायचा. एवढचं काय तर पहिल्याच भेटीत तो त्यांना शरीर संबंध ठेवण्यासाठीही भाग पाडायचा.

पैसे उकळल्याचा आरोप

लैंगिक शोषणाव्यतिरिक्त पांचाळवर पीडित तरुणींकडून पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एकदा का त्याला पैसे आणि भौतिक फायदा मिळला की, तो त्यांच्याशी संपर्क तोडून टाकायचा.

अशी घटना उघडकीस आली?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मीरा रोड येथील एका 31 वर्षीय महिलेने 6 फेब्रुवारी रोजी वालीव पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा या नराधमाच्या कथित गुन्ह्यांची मालिका उघडकीस आली. तिने केलेल्या तक्रारीनुसार, पांचाळने तिच्याशी एका मॅट्रिमोनियल साईटद्वारे संपर्क साधला होता, हिऱ्याचा हार भेट देऊन तिचा विश्वास संपादन केला होता, जो नंतर बनावट असल्याचे आढळून आले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वसई आणि अहमदाबादमधील ज्या दोन हॉटेल्समध्ये तिला बोलावण्यात आले होते त्याची माहितीही तिने पोलिसांना दिली.

तरुणींना भुरळ पाडायचा

वालीव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, पांचाळ अस्खलित इंग्रजी बोलायचा, ज्यामुळे त्याला त्याच्या बळींना हाताळण्यास मदत झाली. तो गोड बोलून महिलांना प्रभावित करायचा. तो पाच फोन आणि एक अॅपल लॅपटॉप वापरत असे. तसेच, ओळख टाळण्यासाठी तो नेहमी हॉटेलच्या वायफाय आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांचाळला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. पांचाळने आणखी किती महिलांना लक्ष्य केले? याचा पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT