Dhirendra Krishna Shastri, said that not just India but he could also make Pakistan a Hindu nation. Dainik Gomantak.
देश

Bageshwar Baba’s Viral Video: "गुजरात के पागलो, कैसे हो"?; धीरेंद्र शास्त्रींचा व्हिडिओ व्हायरल

Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्री यांच्या, ‘देवकी नंदन ठाकूर यांची शिवपुराण कथा’चे वटवा, अहमदाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. गुजराताना पगलो केम छो? (गुजरातच्या वेड्यांनो कसे आहात?) असे म्हणत त्यांनी संबोधनाची सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Not only India, We Will Also Turn Pakistan into Hindurashtra: पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच बिहारमध्ये बागेश्वर बाबांनी पागल हा शब्द वापरल्याने गदारोळ झाला होता. त्याचवेळी आता त्यांचे आणखी एक विधान व्हायरल होत आहे.

वास्तविक बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सूरतमध्ये हिंदू राष्ट्राबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

त्याचबरोबर गुजरातच्या जनतेला वेडे म्हणत संबोधित केले. मात्र अनेक दिवस उलटून गेले तरी पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

खरे तर, अहमदाबादच्या वटवा येथे आयोजित देवकी नंदन ठाकूर यांच्या शिवपुराण कथेत धीरेंद्र शास्त्री यांनी “गुजराताना पगलो केम छो” असे संबोधले. (गुजरातच्या वेड्यांनो कसे आहात?) असे म्हणत त्यांनी संबोधनाची सुरुवात केली.

मात्र, त्यानंतर त्यांनी गुजरातला भक्तीभूमी म्हणत नतमस्तकही केले होते. त्याचवेळी त्यांनी भारतालाच नव्हे तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत वक्तव्य केले. आता या विधानाची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू आहे.

व्हिडिओमध्ये शास्त्री म्हणाले, गुजरात के पागलों कैसे हो? ते पुढे म्हणाले की, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ना पैसा मागायला आलो ना इज्जत. आम्ही आमच्या खिशातून तुम्हाला हणुमान देण्यासाठी आलो आहोत. एवढेच नाही तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी गुजरातचे लोक एकत्र येतील, त्या दिवशी भारतच नव्हे, तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, असेही ते म्हणाले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

धीरेंद्र शास्त्री यांचे गुजरातमध्ये चार कार्यक्रम

बागेश्वर धामचे कथाकार धीरेंद्र शास्त्री यांचे ७ जूनपर्यंत गुजरातमधील चार शहरांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. सुरतनंतर अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा येथेही दिव्य कार्यक्रम होणार आहेत. 29 आणि 30 मे रोजी अहमदाबादमध्ये दरबार होणार आहे. 1 आणि 2 जून रोजी राजकोट आणि 3 ते 7 जून वडोदरा येथे असेल.

26 मे रोजी सुरतमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मी फक्त एकाच पक्षाचा आहे. ती पार्टी बजरंग बलीची आहे. गुजरातच्या जनतेसाठी ते म्हणाले होते की, गुजरातच्या जनतेवर विजय मिळवणे कठीण आहे. मी गुजरातच्या भूमीला नमन करतो. इथल्या लोकांची जगभरात पोहोच आहे. तुमच्यावर विजय मिळवणे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT