Loudspeaker
Loudspeaker Dainik Gomantak
देश

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका HC ने फेटाळली! म्हणाले, "मंदिरांमध्ये..."

Manish Jadhav

Gujarat High Court News: मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे घोषित केले. मंदिरांमध्ये आरती करताना आवाज होत नसल्याचा दावा याचिकाकर्ता करु शकतो का, असा सवाल न्यायालयाने केला. गैरसमजातून दाखल केलेली याचिका असे न्यायालयाने त्याचे वर्णन केले.

दरम्यान, मंदिरांतील घंटांच्या आवाजावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला असून, मंदिरात पहाटे 3 वाजताच ढोल-ताशांवर आरती केली जाते. यामुळे अशा वेळी झोपलेल्या लोकांना त्रास होत नाही का? मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी. मायी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यासोबतच न्यायालयाने अशा जनहित याचिकांवर विचार करण्यास नकार दिला आणि सांगितले की, ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे आणि केवळ 5-10 मिनिटांसाठीच चालते.

याचिकेत काय म्हटले होते

बजरंग दलाचे नेते शक्ती सिंह जाला यांनी ही याचिका दाखल केली होती. अजानमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरामुळे ध्वनी प्रदूषण होते, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि समस्या निर्माण होतात, असे सांगण्यात आले होते. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

दरम्यान, या दाव्यामागे कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मशिदींमध्ये अजान दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर केला जाऊ शकतो. मंदिरांमध्येही लाऊडस्पीकरवर आरती केली जाते. जर अजानमुळे ध्वनी प्रदूषण होत असेल तर मग ढोल-ताशांनी आरती का केली जाते, असा सवाल न्यायमूर्तींनी केली. अजान फक्त 10 मिनिटे चालते, मग ध्वनी प्रदूषण कसे होणार?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Film City: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT