BJP leader
BJP leader Dainik Gomantak
देश

Gujarat: भाजप नेत्याची दारु पार्टी, Video Viral

दैनिक गोमन्तक

Gujarat News: गुजरातमधील एका भाजप नेत्याचा कथितपणे दारु पिऊन असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेत्याला राजीनामा द्यावा लागला. मात्र या घटनेनंतर राज्यातील दारुबंदीच्या प्रश्नावरुन भाजपला सरकारला विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण भाजप (BJP) जिल्हाध्यक्षाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये भाजप नेते रश्मीकांत वसावा हे नशेच्या अवस्थेत स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांची अवस्था अशी आहे की, ते दोन भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने फिरत आहेत.

दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर एका सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी हा व्हिडिओ बनवण्यात आला. द्रौपदी मुर्मू आदिवासी (Tribal) समुदायातून येतात. या कार्यक्रमाला भाजपच्या मंत्री निमिषा सुथारही उपस्थित होत्या.

काँग्रेस आणि आप यांनी प्रश्न उपस्थित केले

गुजरातमध्ये (Gujarat) दारुबंदी आहे. अशात छोटा उदयपूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनीही रश्मीकांत वसावा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत त्यांनी लिहीले की, 'छोटा उदयपूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा व्हिडिओ हा गुजरातमधील दारुचे वास्तव दाखवतो. ही भाजप सरकारची दारुबंदी आहे का? दारुबंदी फक्त कागदावरच अस्तित्वात आहे, कारण इथे सर्वत्र दारु मिळते.'

वसावा यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला

रश्मीकांत वसावा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या राजीनाम्यात वसावा यांनी लिहिले आहे की, 'भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे'.

दुसरीकडे मात्र, या व्हिडिओनंतर गुजरातमधील दारुबंदीच्या वास्तवावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT