Gujarat ATS Drug Seizure Dainik Gomantak
देश

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Gujarat ATS Drug Seizure: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात ‘एटीएस’ यांनी अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ संयुक्त कारवाई करत इराणच्या एका जहाजावरून ५२६ किलोचे अमलीपदार्थ जप्त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

अहमदाबाद: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात ‘एटीएस’ यांनी अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ संयुक्त कारवाई करत इराणच्या एका जहाजावरून ५२६ किलोचे अमलीपदार्थ जप्त केले. काळ्या बाजारात या अमलीपदार्थांची किंमत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.

या जहाजावरील पाकिस्तानच्या पाच तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई २५ सप्टेंबरला केल्याचे तटरक्षक दलाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले. ‘एटीएस’च्या गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तटरक्षक दलाने अरबी समुद्रात जहाज आणि हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहिम सुरू केली.

लक्षद्वीपच्या पश्‍चिम किनाऱ्याजवळ एक संशयास्पद जहाज आढळताच त्यांनी जहाजाचा पाठलाग करत त्यावर नियंत्रण मिळविले. या जहाजावर तपास केला असताना मेथाम्फिटामाइन आणि हेराइन या अमलीपदार्थांचा मोठा साठा आढळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Goa SIR Voter Deletion: 'सॉफ्टवेअरची चूक, शिक्षा मतदारांना का?'; निवडणूक आयोगाची गोवा खंडपीठाकडून झाडाझडती

SCROLL FOR NEXT