Gujarat Accident News Dainik Gomantak
देश

Gujarat Accident News: गुजरातमधील नवसारी येथे लक्झरी बस अन् कारचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

या अपघातात 28 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर कार आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 28 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

  • चालकाला हृदयविकाराचा झटका आला

नवसारी जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 11 जणांना नवसारी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून 17 जणांवर वलसाडमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी 1 गंभीर जखमी प्रवाशाला उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातानंतर बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

  • वलसाडच्या दिशेने जात होती गाडी

प्राथमिक माहितीनुसार लक्झरी बस अहमदाबाद शताब्दी महोत्सवातील प्रवाशांना घेऊन वलसाडच्या दिशेने जात होती. दरम्यान रेश्मा गावाजवळ फॉर्च्युनर कारला धडक दिली. या अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ जाम झाल्याने क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. सध्या पोलीस या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापतही झाली असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर आपापल्या घरी पाठवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT