Grenade blast near Triveni gate army camp area Pathankot Punjab  Twitter @ANI
देश

पंजांबाच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

पंजाबच्या पठाणकोटमधील धीरा पुलाजवळ आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी रात्री उशिरा ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

पंजाबच्या (Punjab) पठाणकोटमधील (Pathankot) धीरा पुलाजवळ आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी द्वार गेटवर (Triveni Gate) सोमवारी रात्री उशिरा ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे .दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा ग्रेनेड फेकल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस दल हजर असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या स्फोटानंतर पठाणकोट आणि पंजाबमधील सर्व पोलीस ब्लॉक हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. यासोबतच पठाणकोट एअर फोर्स स्टेशन आणि इतर आर्मी कॅंट भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(Grenade blast near Triveni gate army camp area Pathankot Punjab)

या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे . स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून ग्रेनेडचे काही तुकडे देखील जप्त केले आहेत. घटनेचा तपास सुरू आहे.या घटनेबद्दल अधिक माहिती देताना पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा म्हणाले, “ ग्रेनेड स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी कळले आहे. पुढील तपास सुरू आहे. एक मोटारसायकल निघून गेली, त्याचवेळी स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आम्हाला चांगले सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची आशा आहे."

याआधी सुमारे 6 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये हवाई दलाच्या कमांडोसह 6 जवान शहीद झाले होते . ही एक मोठी सुरक्षा त्रुटी मानली गेली होती . या हल्ल्यानंतर झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी ५ हल्लेखोरांना ठार केले होते. सर्व दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान केला होता आणि ते एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसण्यात यशस्वी झाले होते. या वर्षी जूनमध्ये जम्मू विमानतळाच्या एअरफोर्स स्टेशन परिसरातही दोन स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला होता, त्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते आणि नंतर यामध्ये पाकिस्तानचा कथित सहभागही उघड झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT