Grain ATM Dainik Gomantak
देश

रेशन तक्रारींना बसणार आळा; Grain ATM मधून 5 मिनिटात मिळणार धान्य

या एटीएम (Grain ATM) मशीनमधून पाच ते सात मिनिटांत एका वेळी 70 किलो धान्य काढू शकता येणार आहे.

दैनिक गोमन्तक

गुरुग्राम: जर तुम्हालाही पूर्वी कमी रेशन (Ration) मिळत होते किंवा बराच वेळ रेशन च्या दुकानात थांबावे लागत होते, तर आता तुमचा हा त्रास लवकरच दुर होणार आहे. भारतात नव्या उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) उभे करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही एटीएमच्या मदतीने आजर्यंत क्षणात पैसे काढत होता, तर आता तुम्ही 5 मिनिटात एटीएममधून धान्य काढू शकणार आहात. भारतातील हे पहिलेच एटीएम आहे, ज्यामध्ये पैशांऐवजी तुम्हाला धान्य निघणार आहे. हरियाणा राज्यातील गुरुग्राममध्ये हे एटीएम स्थापन करण्यात आले आहे. या एटीएमचा मोठा फायदा म्हणजे आपल्याकडे रेशनमध्ये होणारा भ्रष्टाचार कमी होइल आणि रेशन मिळण्याची तक्रारी पूर्णपणे बंद होतील. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिले ‘ग्रेन एटीएम’ उभारण्यात आले आहे.(Grain ATMs have been set up to curb ration complaints)

एकावेळी किती धान्य काढू शकणार?

या एटीएम मशीनमधून पाच ते सात मिनिटांत एका वेळी 70 किलो धान्य काढू शकता येणार आहे. गुरुग्राममधील फारूक नगरमध्ये स्थापन केलेली ही बँक पुर्णपणे एटीएमच्या धर्तीवर काम करणार आहे. आपला अंगठा लावून ग्राहकांना येथून धान्य काढता येणार आहे.

किती प्रकारचे धान्य बाहेर येणार?

या धान्याच्या मशिनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिकप्रणाली देखील बसवण्यात आली आहे. या मशीनमधून धान्य काढून घेण्यासाठी लाभार्थ्यास आपला आधारकार्ड नंबर, आपल्या रेशन कार्डचा नंबर द्यावा लागणार आहे. त्याचवेळी एका मशीनमधून तीन प्रकारची धान्ये काढली जातील, ज्यात गहू, तांदूळ आणि बाजरीचा समावेश असणार आहे.

एटीएममध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध

हे एक ऑटोमॅटिक यंत्र आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते. बायोमेट्रिकच्या मदतीने त्यातून धान्य काढता येते. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांना ठरवून दिलेले अन्नधान्य मशीनअंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये आपोआप भरले जाणार. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापन होणाऱ्या या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे या यंत्राचे नाव आहे. अधिकारी अंकित सूद यांच्या माहितीनुसार या मशीनमुळे धान्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही आणि भ्रष्टाचारही होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना योग्य दरात, कमी वेळात चांगले अन्नधान्य पुरविले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT