Karnataka Government Against Communal Violence: कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी राज्यात जातीय द्वेष पसरवणाऱ्या संघटनांना इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय संघटनेने शांतता बिघडवण्याचा, जातीय द्वेष पसरवण्याचा आणि कर्नाटकला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास आमचे सरकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास हयगय करणार नाही. मग ती RSS असो वा अन्य कोणतीही संघटना.
प्रियांक खर्गे म्हणाले की, राज्याच्या आर्थिक प्रगतीला आणि समृद्धीला बाधा आणणारे आणि कर्नाटकच्या जनतेच्या हिताच्या विरोधात असलेले सर्व कायदे आणि आदेश आमचे सरकार मागे घेईल.
ते म्हणाले की, मागील सरकारने काही प्रमुख व्यक्तींच्या जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता आणि इतरांना डावलले होते.
नुसती जयंतीच नाही तर मागील भाजप सरकारचे आदेश, पाठ्यपुस्तके असोत, गोहत्याविरोधी असोत किंवा धर्मांतरविरोधी कायदे असोत, या सर्वांमध्ये सुधारणा केल्या जातील. कर्नाटकला पुन्हा अव्वल बनवण्याचे आमचे लक्ष्य असून, त्या दिशेने आम्ही पावले टाकू, असे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या आठ मंत्र्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआय सारख्या संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
मॉरल पोलिसिंगबाबत मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता
यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही बेंगळुरूमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आता मॉरल पोलिसिंग होणार नसल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी गुन्ह्यांकडे या धर्माच्या किंवा त्या धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे आणि समान संरक्षण दिले पाहिजे. पोलिसांनी लोकांशी मैत्रीपूर्ण वागावे आणि दुसरे म्हणजे पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांशी त्यांनी नम्रपणे वागावे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे भाजपच्या दक्षिण विजयाचे द्वार आता काँग्रेसच्या हातात गेले आहे.
काँग्रेसच्या या विजयात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा महत्वाचा वाटा आहेच. याशिवाय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही निकालांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.