Arif Mohammad Khan Dainik Gomantak
देश

Kerala VC Controversy: केरळच्या राज्यपालांचे 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश

सोमवार 24 ऑक्टोबर सकाळी साडेअकरा पर्यंत मुदत

गोमन्तक डिजिटल टीम

Kerala VC Controversy: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना तत्काळ राजीनामा द्यायचे आदेश दिले आहेत. सोमवार, 24 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत राजीनामा देण्याचा अवधी राज्यपालांनी दिला आहे.

एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोग तथा यूजीसीच्या नियमांना डावलून झाली होती. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला होते.

राजभवनने एक ट्विट केले आहे. त्यानुसार नऊ कुलगुरूंमध्ये एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचाही समावेश आहे. राजभवनकडून विद्यापीठांच्या कुलगुरूंना तत्काळ प्रभावाने राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.

आणखी एका ट्विटमध्ये राज्यपालांनी म्हटले आहे की, कुलगुरूंनी सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत राजीनामा पाठवावा. राजभवनाच्या माहितीनुसार कुलगुरूंसह कुलसचिव आणि रजिस्ट्रार यांनाही ही नोटीस ई-मेलवर पाठवली गेली आहे.

ज्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना ही नोटीस पाठवली गेली आहे, त्यामध्ये केरळ विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कोचीन, केरला युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज, कन्नुर विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिकत, थुनचथ एझुथचन मल्याळम विद्यापीठ या विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT