Education Dainik Gomantak
देश

Government Education Initiatives: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर; 12.5 लाख विद्यार्थ्यांना सरकार करणार मदत

National Education Policy 2024: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार एक योजना सादर करण्याचा विचार करत आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे खाजगी कोचिंगवर अवलंबित्व कमी होईल.

Manish Jadhav

SATHEE Program: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार एक योजना सादर करण्याचा विचार करत आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे खाजगी कोचिंगवर अवलंबित्व कमी होईल. या योजनेच्या माध्यमातून सरकार 2029 पर्यंत 12.5 लाख विद्यार्थ्यांना मदत करणार आहे.

या योजनेचा उद्देश विनामूल्य डिजिटल संसाधने, AI-आधारित शैक्षणिक साधने, तसेच, वंचित भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या संस्थांमधील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे हा आहे.

TOI रिपोर्टनुसार, मंगळवारपासून लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या अंमलबजावणीबाबत दोन दिवसीय बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्यांशी या महत्त्वाच्या योजनेवर चर्चा करेल. तसेच, इतर विषयांबरोबरच शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी त्यांच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समकक्षांशी मान्यता आणि डिजिटल शिक्षणावर चर्चा करतील.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार खाजगी कोचिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समर्थन वाढवण्याच्या सहयोगाबद्दलही विचारविमर्श करण्यासाठी तयार आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी SATHEE पोर्टल

काही दिवसांपूर्वी, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी SATHEE पोर्टल सुरु केले. हे पोर्टल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची विनामूल्य तयारी करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.

हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विनामूल्य डिजिटल संसाधने, AI-आधारित शिक्षण साधने, IIT आणि AIIMS चे सहयोग, DTH प्लॅटफॉर्मवरील साधणे आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेशाचे सरलीकरण करण्याच्या प्रयत्नांसाठी विनामूल्य डिजिटल संसाधने देते.

या योजनेद्वारे, सरकारने देशातील 10 भारतीय उच्च शिक्षण संस्थांना जगातील टॉप 200 मध्ये स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिपोर्टनुसार, बैठकीच्या अजेंड्यामध्ये डिजिटल शिक्षणाचा विस्तार करण्याच्या धोरणांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier History: स्पेनच्या राजघराण्यात जन्म, आयुष्यभर धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियर यांचा इतिहास

Goa Today's Live Updates: पर्यावरणीय मान्यता देण्यास प्राधिकरणाचा नकार, कायदेशीर रेती उत्खननाला होणार पुन्हा विलंब!

IFFI Goa 2024: इफ्फी प्रतिनिधींसाठी खास इलेक्ट्रीक बससेवा, रिक्षाचीही मोफत सोय; जाणून घ्या रुट

Saint Francis Xavier Exposition: 10 वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आले संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव; पाहा पहिली झलक

IFFI Goa 2024: "केवळ पैसा असला म्हणजे चित्रपट बनवता येत नाही"; शेखर कपूर असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT