Google & WhatsApp take action against Indian's who not following New IT Rules
Google & WhatsApp take action against Indian's who not following New IT Rules  Dainik Gomantak
देश

Google, WhatsApp कडून नियमांचं पालन न करणाऱ्या 22 लाख भारतीयांवर कारवाईचा बडगा

दैनिक गोमन्तक

गुगलचे (Google) नियम तोडणाऱ्यांना कंपनीने जोरदार दणका दिला आहे. नवीन आयटी (New IT Rules)नियमांनुसार WhatsApp आणि गुगलचे नियमांचे पालन न करणाऱ्या गुगल आणि WhatsApp यूजर्सवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये, Google ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 76,967 लोकांवर कारवाई केली असून त्यांना ब्लॉक केले आहे . दुसरीकडे, फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsAppने सुमारे 22 लाख WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे. गुगल आणि WhatsAppने त्यांच्या मासिक अहवालात याबाबतीत खुलासा केला आहे.(Google & WhatsApp take action against Indian's who not following New IT Rules)

गुगलला सप्टेंबर महिन्यात यूजरकडून 29,842 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . यापैकी गुगलला 76,967 सामग्री चुकीची असल्याचे आढळून आले आणि कंपंनीने अशा अकाउंट्सना ब्लॉक केले आहे . गुगलने आपल्या मासिक अहवालात याचा खुलासा केला आहे. यातील बहुतांश तक्रारी थर्ड पार्टींशी संबंधित आहेत, ज्या स्थानिक नियमांच्या विरोधात आहेत. तसेच यात काही तक्रारी पेटंट आणि पायरसीच्या देखील आहेत.

Google कढे आलेल्या तक्रारी

  • कॉपीराइट - 76,444

  • ट्रेडमार्क -493

  • ग्राफिक सेक्सुअल कंटेंट -11

  • कोर्ट आर्डर -10

  • काउंटरफीट - 5

तर WhatsAppने 22 लाखांहून अधिक WhatsApp अकाउंट बॅन केले आहेत. याबाबत कंपनीने सांगितले की, युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या खात्यांची संख्या 22 लाख 9 हजार आहे. व्हॉट्सअॅपनुसार, सप्टेंबरमध्ये 560 यूजर्सच्या तक्रारी आल्या होत्या. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत WhatsApp ने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ञांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे जेणेकरून ते वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वयंचलित मार्गाने बनावट पोस्ट आणि सामग्री ओळखण्यासाठी मदत होईल आणि नियम मोडणाऱ्यांवर योग्य कारवाई करता येईल.

नेमकी कोणत्या WhatsApp तक्रारींवर कारवाई झाली आहे

  • एकाउंट सपोर्ट - 121

  • अपील - 309

  • अन्य सपोर्ट व प्रोडक्ट सपोर्ट - 49

  • सेफ्टी - 32

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT