Google Store India Dainik Gomantak
देश

Google Store India: Appleला देणार टक्कर! भारतात लवकरच गुगलचं रिटेल स्टोअर

Google retail store India: अ‍ॅपलनंतर आता गुगलही भारतात रिटेल स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. कंपनी पुढील सहा महिन्यांत पहिले स्टोअर उघडू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Sameer Amunekar

Google Retail Store In India

भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गुगल लवकरच भारतात आपलं पहिलं रिटेल स्टोअर्स उघडणार आहे. यामुळं ग्राहकांना पिक्सेल फोन, पिक्सेल वॉच, इअरबड्स आणि इतर हार्डवेअर उत्पादने प्रत्यक्ष पाहण्याची, हाताळण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, सध्या दिल्ली आणि मुंबईच्या आसपास स्टोअर्ससाठी योग्य जागा शोधल्या जात असून, लवकरच अंतिम निवड केली जाऊ शकते.

अ‍ॅपलनं भारतात आपली अधिकृत स्टोअर्स सुरू केल्यानंतर ग्राहकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर गुगल देखील आपले स्टोअर्स सुरू करून ग्राहकांसोबत थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

गुगलचे सध्या फक्त ५ रिटेल स्टोअर्स आहेत, आणि हे सर्व स्टोअर्स अमेरिकेत आहेत. या स्टोअर्समध्ये कंपनी पिक्सेल फोन, घड्याळे, इअरबड्स आणि इतर हार्डवेअर उत्पादने विकते.

दुसरीकडे, अ‍ॅपलचे जगभरात ५०० हून अधिक स्टोअर्स आहेत. भारतातही अ‍ॅपलच्या स्टोअर्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गुगलकडून लक्झरी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न दिसून येतो. रिपोर्ट्सनुसार, जर गुगलला सुरुवातीच्या स्टोअर्समध्ये यश मिळाले, तर भविष्यात भारतात अधिक स्टोअर्स उघडण्याचा विचार केला जाऊ शकतो.

गुगलच्या या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांना थेट कंपनीकडून उत्पादने खरेदी करण्याची आणि त्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे एक स्टोअर सुमारे १५,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे असेल आणि ते पुढील सहा महिन्यांत उघडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaji Bus: 'म्हजी बसमुळे अपघात - वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल', CM सावंताचे प्रतिपादन; 4 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

Chorla Ghat: चोर्लाघाट ठरतोय ‘मृत्‍यूचा सापळा’! ठिसूळ झाडे, दरडी; प्रवाशांचा जीव धोक्यात

चुलीत पेटवली आग, दोन सिलिंडरचा मोठा स्फोट, लाखोंची मालमत्ता जळून खाक; Watch Video

Mayem: ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला, 10 तास वीज गायब; मये परिसरात दिवसभर लोकांचे हाल

Anmod Ghat: ..पुन्हा निर्णय मागे! अनमोड घाट 15 सप्टेंबरपासून होणार खुला; वाढीव कालावधीस कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT