Google Search Live Dainik Gomantak
देश

Google Search Live: गुगलचं भन्नाट AI फिचर लॅान्च! टायपिंगला करा रामराम, आता गुगलशी बोला आणि मिळवा हवं ते उत्तर

Google Search Live Feature: सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने प्रगत होत आहे. याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये नवे आणि स्मार्ट ‘Search Live’ हे फिचर लॅान्च केले आहे.

Sameer Amunekar

सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने प्रगत होत आहे. याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये नवे आणि स्मार्ट ‘Search Live’ हे फिचर लॅान्च केले आहे. या फिचरमुळे आता वापरकर्ते फक्त टाइप न करता थेट गुगलशी बोलून कुठल्याही विषयावर माहिती मिळवू शकतात.

काय आहे ‘Search Live’ फिचर?

गेल्या महिन्यात पार पडलेल्या Google I/O 2025 या कार्यक्रमात गुगलने आपल्या सर्च इंजिनसाठी नव्या एआय मोडची घोषणा केली होती. आता याच मोडमध्ये ‘Search Live’ हे विशेष फीचर लॅान्च करण्यात आलं आहे. हे फिचर ChatGPT Live Talk आणि Gemini Live सारख्या फिचर्सला थेट स्पर्धा देत आहे.

यात वापरकर्ता गुगल अ‍ॅपमध्ये “Live” आयकॉनवर टॅप करून थेट बोलून प्रश्न विचारू शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे, संवाद अगदी मानवासारखा वाटतो आणि उत्तरंही लगेच मिळून जातं

Search Live'ची खास वैशिष्ट्यं

  • टाइप करण्याची गरज नाही, बोलून सर्च करता येत.

  • ह्यूमनसारखा संवाद – AI तुम्हाला बोलतंय असं वाटेल!

  • बॅकग्राउंडमध्ये कार्यरत – दुसऱ्या अ‍ॅपमध्ये असतानाही गुगलशी संभाषण सुरू ठेवता येतं

  • Transcript बटण – उत्तराचं मजकूरात रूपांतर सहज मिळणार

  • AI Mode History – आधी विचारलेले प्रश्न-उत्तर कधीही पुन्हा पाहता येतील

  • Gemini Custom AI वापर – अचूक, स्मार्ट आणि वेगवान उत्तरं मिळणार

कसं वापरायचं?

  • तुमच्या Android किंवा iOS डिव्हाईसवर गुगल अ‍ॅप उघडा.

  • सर्च बारच्या खालील बाजूस असलेलं "Live" आयकॉन निवडा.

  • त्यानंतर थेट गुगलशी बोला आणि तुमचे प्रश्न विचारा.

गुगलच्या या नव्या फिचरमध्ये लवकरच कॅमेरा इंटिग्रेशन येणार आहे. यामुळे वापरकर्ते एखादी वस्तू किंवा जागा कॅमेऱ्यात दाखवून थेट प्रश्न विचारू शकतील. उदाहरणार्थ, एखाद्या फळाचं नाव, एखादं ऐतिहासिक स्थळ किंवा फूड डिश याची ओळख पटवून घेतली जाऊ शकते.

सध्या हे कॅमेरा फिचर अमेरिकेत चाचणी स्वरूपात सुरू आहे. लवकरच हे वैशिष्ट्य इतर देशांमध्येही आणले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT