Google Map Dainik Gomantak
देश

Google Map: गुगल मॅपवर ठेवला विश्वास अन् गाडी थेट... ; पाहा व्हिडिओ!

Google Map: तुम्ही रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करत असाल तर सावध राहा. कारण गुगल मॅफवर रस्ता शोधणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

Puja Bonkile

Google Map: आजकाल सर्व कामे डिजिटल झाल्यामुळे कामे सोपे झाले आहे. रस्ता शोधण्यासाठी देखील गुगल मॅपची मदत घेतो. यामुळे प्रवास करणे सोपे झाले आहे. गुगल मॅपवर लोकेशन टाकताच आपल्याला सर्वात चांगला आणि जवळचा मार्ग दिसतो. एवढेच नाही तर पर्यायी मार्गही उपलब्ध असतात. परंतु कधीकधी ते अडचणीत टाकू शकते. तामिळनाडूहून कर्नाटकात जाण्यासाठी एक व्यक्ती गुगल मॅप वापरत होता. पण तो रस्ता चुकला आणि गुगल मॅपच्या माध्यमातून अशा ठिकाणी पोहोचलो तेथून परतण्यासाठी स्थानिक लोक आणि पोलिसांची मदत घ्यावी लागली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी काही मित्र तामिळनाडूच्या 'गुडालूर'मध्ये 'हॉलिडे स्पॉट'वर पोहोचले होते. कर्नाटकातील हे सर्व मित्र त्यांच्या एसयूव्ही कारमधून परतत असताना चालकाने गुगल मॅपची मदत घेतली. यातून त्यांनी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. यानंतर गुगल मॅपच्या माध्यमातून तो निवासी भागातील एका उंच ठिकाणी पोहोचला. तेथून पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचे वाहन पायऱ्यांवरून खाली उतरवण्यात आले.

गुगल मॅपमुळे आले अडचणीत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही मित्र तामिळनाडूतील गुडालूर या हिल टाऊनमध्ये फिरण्यासाठी आणि वीकेंड साजरा करण्यासाठी आले होते. यानंतर ते आपल्या कर्नाटक राज्यात परतत होते. परंतु त्यांना दुसरीकडे कुठेतरी जायचे होते आणि तेथे पोहोचल्यानंतर तो दुसरीकडे गेले. त्यासाठी त्यांनी गुगल मॅपचा वापर केला. हे सर्व मित्र ज्या रोडने जात होते.

गुगल मॅपने या रस्त्यावर लवकर पोहोचायला सांगितले होते. या मार्गावरून जात असताना त्यांची गाडी अशा ठिकाणी पोहोचली. तिथे जाण्यासाठी पायऱ्या होत्या. गाडी काही अंतर पायऱ्यांवरून पुढे निघाली. मग ती अडकली. नंतर गाडी पायऱ्यांवरून खाली आणण्यासाठी पोलीस आणि स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पायऱ्या उतरून सगळे मित्र आपापल्या गाडीतून कर्नाटकला निघाले. तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील 'गुडालूर' हे पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण आहे. हे तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांच्यातील ट्राय-जंक्शन आहे. उटी हिल स्टेशनला जाणारे पर्यटक येथे येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT