Google Search Dainik Gomantak
देश

आता तुम्हाला मोबाइलवर मिळणार भूकंपाची अपडेट, गुगलने लॉन्च केली खास यंत्रणा

Google: आघाडीची तंत्रज्ञान कंपनी गुगलने बुधवारी भारतात भूकंपाचा इशारा देणारी यंत्रणा लॉन्च केली.

Manish Jadhav

Google: आघाडीची तंत्रज्ञान कंपनी गुगलने बुधवारी भारतात भूकंपाचा इशारा देणारी यंत्रणा लॉन्च केली. ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. यामध्ये भूकंप होताच लोकांना सतर्क केले जाईल. याद्वारे लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत होणार आहे. भूकंप ही जगातील सर्वात सामान्य नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. तात्काळ चेतावणी मिळताच, लोक स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना वेळेत सुरक्षित ठिकाणी नेतील. हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NSC) यांच्याशी सल्लामसलत करुन ही यंत्रणा भारतात सुरु करण्यात आली आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये भूकंपाची संभाव्यता आणि त्याचा अंदाज घेण्यासाठी सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोन एका लहान प्रवेगमापकाने सुसज्ज असतो, जो लघु भूकंपमापक म्हणून काम करु शकतो. जेव्हा फोन प्लग इन केला जातो आणि चार्ज होतो तेव्हा तो भूकंपाची संभाव्यता ओळखू शकतो.

Google दोन प्रकारचे अलर्ट पाठवते: Be Alert आणि Take Action.

"आज, NSC सोबत सल्लामसलत करुन आम्ही भारतात Android Earthquake Alert System लॉन्च करत आहोत," असे कंपनीने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे. याद्वारे, Android वापरकर्त्यांना भूकंपाची स्वयंचलित पूर्वसूचना देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही सेवा येत्या आठवड्यात अँड्रॉईड-5 आणि त्यानंतरच्या व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. ही यंत्रणा अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये असलेल्या छोट्या 'एक्सेलेरोमीटर'ची मदत घेते, जी मिनी सिस्मोमीटर म्हणून काम करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT