Google Fraud Alert Dainik Gomantak
देश

Google Fraud Alert: बँकिंग फ्रॉड वाढतोय! 'या' 9 अ‍ॅप्समुळे होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक, आजच डिलीट करा

Fraud Apps: सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले कोणतेही अ‍ॅप्स सावधगिरीने वापरा. ​​एका संशोधनात काही अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक असल्याचे समोर आलं आहे.

Sameer Amunekar

Google Fraud Alert Play Store Fraudulent Apps

गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी सरकार तसेच टेक कंपन्यांकडून विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. प्रत्येकाने याबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे, निष्काळजीपणा केल्यास वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. बँक खाते देखील रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. एका संशोधनात काही धोकादायक अ‍ॅप्स उघड झाले आहेत जे मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी धोक्यापेक्षा कमी नाहीत.

सायबर रिसर्च अँड इंटेलिजेंस लॅब्स (CRIL) ने त्यांच्या अलीकडील संशोधनातून सुमारे २० मोबाईल अ‍ॅप्सवर संशय व्यक्त केला आहे. या अ‍ॅप्सवर वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरी करण्याचा गंभीर आरोप आहे. संशोधनानुसार, हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या फोनमधील माहिती आणि गोपनीय डेटाची चोरी करत आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांची ऑनलाइन सुरक्षितता आणि गोपनीयता मोठ्या धोक्यात येत आहे.

सायबर रिसर्च अँड इंटेलिजेंस लॅब्सच्या संशोधनानुसार, असे २० अ‍ॅप्स आहेत जे वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटा आणि गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत. या अ‍ॅप्समध्ये दुर्भावनापूर्ण क्रिप्टोकरन्सी वॉलेट अ‍ॅप्सचा समावेश आहे. हे सर्व सक्रिय फिशिंग घोटाळ्यांचा भाग आहेत आणि लोकांचा डेटा चोरत आहेत. हे बँक खात्यांसाठी देखील धोकादायक ठरू शकतात.

हे ९ अ‍ॅप्स ताबडतोब अनइंस्टॉल करा

  1. Suiet Wallet

  2. Hyperliquid

  3. Pancake Swap

  4. Meteora Exchange

  5. OpenOcean Exchange

  6. Harvest Finance blog

  7. BullX Crypto

  8. SushiSwap

  9. Raydium

वापरकर्त्यांसाठी किती धोकादायक?

नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, काही फोन अ‍ॅप्स वापरकर्त्यांकडून १२ इंग्रजी शब्दांची नोंदणी करण्यास सांगतात, जे क्रिप्टो वॉलेट पुनर्प्राप्तीसाठी वापरले जातात. या शब्दांची मदत घेत हॅकर्स वापरकर्त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये सहज प्रवेश करू शकतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो.विशेष म्हणजे, हॅकर्स सहसा व्हिडिओ टूल्स, गेमिंग अ‍ॅप्स किंवा इतर मनोरंजक अ‍ॅप्सद्वारे फोनमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. या अ‍ॅप्सच्या गोपनीयता धोरणांत URL लपवलेले असते, जे वापरकर्त्यांना दिसत नाही, पण ते डाउनलोड करताच हॅकर्स त्यांच्या खात्यात घुसखोरी करतात.

नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्या फोनमध्ये असे संशयास्पद अ‍ॅप्स असतील तर तात्काळ त्यांना हटवावे. तसेच, अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि भविष्यात अशा लिंकद्वारे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करणे टाळा. सुरक्षिततेसाठी नियमितपणे फोन आणि अ‍ॅप्सची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT