Sovereign Gold Bond Dainik Gomantak
देश

Gold Price Today: सोन्याबाबत महत्वाची बातमी! जागतिक घडामोडींचा थेट परिणाम; काय आहेत आजचे दर? जाणून घ्या..

Gold Rate Today: राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवे उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला असून शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघेही सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर फेब्रुवारी महिन्यात डिलिव्हरी असलेल्या २४ कॅरेट सोन्याच्या वायदा व्यवहारात घसरण झाली. या व्यवहारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ४२ हजार ६०१ रुपयांवर आला. दुसरीकडे, अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार दिल्लीत सर्व करांसह २४ कॅरेट सोन्याचा दर घटून प्रति दहा ग्रॅम १ लाख ४६ हजार २०० रुपये झाला आहे.

गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर आणखी घसरत प्रति दहा ग्रॅम १ लाख ४३ हजार ५५० रुपयांपर्यंत खाली आला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)नुसार बाजार बंद होईपर्यंत सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ५९३ रुपये इतका नोंदवला गेला. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी बाजार बंद असल्याने हेच दर पुढील दोन दिवसांसाठी लागू राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून आला. जागतिक स्तरावर हाजिर सोन्याचा दर घसरून प्रति औंस ४,६०३.५१ डॉलरवर पोहोचला आहे. अमेरिका, युरोपमधील आर्थिक संकेत, व्याजदर धोरणे आणि डॉलरमधील चढउतार यांचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

IBJAने जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार आज देशांतर्गत बाजारातील सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ५९३ रुपये असून, २३ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४१ हजार २६ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २९ हजार ६९९ रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ६ हजार १९५ रुपये, तर १४ कॅरेट सोन्याचा दर ८२ हजार ८३२ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये पुढील काळात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, खरेदी किंवा गुंतवणूक करताना बाजारातील हालचाली लक्षात घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

VIDEO: "म्हणून 50 हजार खर्चून गोव्याला जातो!" समुद्रात कचरा फेकणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांचा पारा चढला

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT