National Subjunior Hockey
National Subjunior Hockey Dainik Gomantak
देश

पेडे-म्हापसा : गोव्याचे पुदुचेरीवर अर्धा डझन गोल

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या मुलांनी शनिवारी अप्रतिम खेळ करत राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी फ गट लढतीत पुदुचेरीचा 6- 0 फरकाने धुव्वा उडविला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर सुरू आहे. ( Goa's six goals against Puducherry )

स्पर्धेतील पहिल्या लढतीत दिल्लीस 1 - 1 असे गोलबरोबरीत रोखलेल्या गोव्याचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. पुदुचेरीविरुद्ध गोव्याच्या दीपक नाविक व पंकज नाईक या आक्रमकांनी शानदार खेळ केला. गोव्याच्या आक्रमकतेसमोर पुदुचेरीचा बचाव ढेपाळला, त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. दीपकने हॅटट्रिक नोंदविताना अनुक्रमे तिसऱ्या, 54 व 56 व्या मिनिटास गोल केला. पंकजनेही विजयात मोलाचा वाटा उचलताना दोन गोल (5 व 30 वे मिनिट) केले. गोव्याचा अन्य एक गोल ३५व्या मिनिटास किरण लमाणी याने नोंदविला.

स्पर्धेतील अन्य लढतीत ग गटात बिहारने अरुणाचलचा 10-2 असा धुव्वा उडविला, याच गटातील अन्य एका लढतीत जम्मू-काश्मीरने तेलंगणास 4- 2 असे पराजित केले. ह गटातील लढतीत चंडीगडने महाराष्ट्राचा 11- 3 असा, तर मध्य प्रदेशने आसामचा 7- 1 असा पराभव केला. फ गटात पंजाबने सलग दुसरा विजय नोंदविताना दिल्लीचा 8- 0 फरकाने फडशा पाडला.

अरुणाचलविरुद्ध बिहारसाठी रविकांत कुमारने तीन, शाणू लामा व अमरेंद्रकुमार सिंग यांनी प्रत्येकी दोन, विकासकुमार यादव, महंमद समीर, अतित कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला. अरुणाचलतर्फे सचिन व अमरजित सिंग यांनी गोल केले. तेलंगणाविरुद्ध जम्मू-काश्मीरच्या विजयात कर्णधार राजवीर सिंगने दोन, तर रोहित कुमार व दलिप अनुरागी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

गुरप्रीत सिंगचे पाच गोल, कोमलप्रीत सिंगचे दोन गोल, तसेच मिस्बा खान, फतेह सिंग, सुखमनप्रीत सिंग, गुरजित सिंग यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे चंडीगडला महाराष्ट्रावर आरामात विजय नोंदविणे शक्य झाले. महाराष्ट्रातर्फे शिवम धोंडे, उदित सैनी व अर्जुन हरगुडे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. मध्य प्रदेशच्या विजयात रितेंद्रप्रताप सिंगने चार, करण गौतमने दोन, राजाभैया कोरी याने एक गोल केला. आसामचा एकमात्र गोल मानसरिज बोरो याने केला. प्रभदीप सिंग, प्रभज्योत सिंग, हरप्रीत सिंग, करण सिंग, मनप्रीत सिंग, प्रीतपाल सिंग, रोहन भूषण व जपनित सिंग यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT