Go First Crisis Dainik Gomantak
देश

Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

वाडिया ग्रुपची एअरलाइन 24 मे पासून छोट्या फ्लाइट उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहे. रद्द झालेल्या फ्लाइटचा परतावा लवकरच दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Go First Plans to Restart Services from 24 May: गो फर्स्ट एअरलाइन त्यांची फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एअरलाइन 24 मे पासून आपली फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करू शकते. लहान-मोठे फ्लाइटसह सुरू होऊ शकते. 

अहवालानुसार 23 विमानांनी विमानसेवा सुरू करण्याची योजना सुरु करणार असुन 2 मे पर्यंत विमान कंपनीची एकूण 27 विमाने उड्डाण सेवा देत होती. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर त्याचे 51 आणि 37 डिपार्चर स्लॉट आहेत. 

विशेष म्हणजे, एअरलाइनने एक दिवस आधी घोषणा केली होती की त्यांनी 19 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत, तर त्यापूर्वी 12 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. 

NCLT संरक्षण देण्यास सहमत

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने GoFirst ला सुरक्षा देण्याचे मान्य केले आहे. एनसीएलटीने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आम्ही दिवाळखोरीच्या कारवाईसाठी गो फर्स्ट एअरलाइनची याचिका स्वीकारतो.

एनसीएलटीने कंपनीला एअरलाइन चालू ठेवण्याचे आणि कर्मचाऱ्यांची छाटणी न करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 40 विमाने परत करण्याची मागणी 

एनसीएलटीच्या आदेशानंतर गोफर्स्टचे सीईओ कौशिक खोना यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. भारतातील (India) ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या भारतीय विमान कंपनीने स्वेच्छेने करार आणि कर्जाची फेरनिविदा करण्यासाठी दिवाळखोरी संरक्षणाची मागणी केली आहे. त्याच वेळी, भाडे न भरल्यामुळे, सुमारे 40 गो फर्स्ट विमाने परत करण्याची मागणी विमान वाहतूक नियामकाकडे करण्यात आली आहे. 

  • प्रवाशांना रिफंडची चिंता 

GoFirst Airline ही सर्वात स्वस्त दरात फ्लाइट तिकीट ऑफर करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. अनेक उड्डाणे रद्द केल्यानंतर, बहुतेक प्रवासी अजूनही परताव्याच्या चिंतेत आहेत. प्रवाशांना परतावा मिळत नाही. दुसरीकडे, विमान कंपनीने लवकरच सर्व प्रवाशांचे संपूर्ण पैसे परत केले जातील असे सांगितले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT