Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: केदारनाथ मंदिरासमोर मुलीने केलं बॉयफ्रेंडला प्रपोज! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Kedarnath Temple: केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात आकर्षक आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे. एक्स्ट्रीम वेदरमुळे, मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान भक्तांसाठी खुले राहते.

Manish Jadhav

Kedarnath Temple: केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात आकर्षक आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे. एक्स्ट्रीम वेदरमुळे, मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान भक्तांसाठी खुले राहते. त्यामुळे केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गौरीकुंडापासून 22 किमीचा पायी प्रवास करतात.

'केदारखंड देवाची' पूजा करण्यासाठी सर्व मार्गाने प्रवास करणारे भक्त असताना, काही Instagrammers आणि सोशल मीडिया यूजर्संनी इंटरनेटवर एक ट्रेंड बनवला आहे.

अनेक लोक केवळ व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी या पवित्र ठिकाणी भेट देत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

केदारनाथ मंदिरासमोर मुलीने प्रपोज केले

दरम्यान, केदारनाथ मंदिरासमोर एका प्रियेसीने आपल्या प्रियकराला प्रपोज केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपे भगवान शिवाची पूजा करताना दिसत आहे. पिवळे कपडे घातलेले, दोघे मोहक दिसत आहेत.

मात्र, प्रियकराला काही समजण्याआधीच प्रियेसीने गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केले. चकित झालेला प्रियकर नंतर भावूक होतो आणि जोडपे एकमेकांना मिठी मारताना दिसतात.

हा मनमोहक व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला असून त्यावर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे सांगितले जात आहे

सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत लोकांच्या भिन्न-भिन्न प्रतिक्रिया येत आहेत. धार्मिकस्थळी हा प्रकार योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, काही लोकांनी अशा व्हिडिओंचे वर्णन फक्त प्रेमळ आणि सुंदर असे केले आहे.

काही लोकांनी तर असे म्हटले आहे की, हे सर्व स्क्रिप्टेड आहे आणि फक्त व्हायरल होण्यासाठी केले आहे. यापूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्याला पाठीवर घेऊन केदारनाथ धामला पोहोचला होता.

त्याने आपल्या कुत्र्यासोबत भगवान नंदीच्या चरणांना स्पर्शही केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बराच वाद झाला होता.

व्हायरल मुलगी ही शिवभक्त आहे

दरम्यान, ही व्हायरल रायडर मुलगी विशाखा आहे, जी भारतातील पहिली महिला मोटो ब्लॉगर आहे. केदारनाथ मंदिरासमोर तिने हिमाचलचा रहिवासी असलेल्या प्रियकराला प्रपोज केले आहे. ती शिवभक्त असल्याचे सांगितले जाते.

रायडर गर्ल विशाखा ही निर्भीड आणि उत्साही मुलगी आहे, तिच्या आईने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आज विशाखाच्या यशामागे तिची तीन वर्षांची मेहनत आहे.

मणिपूरसह अनेक राज्यांच्या पर्यटन विभागाने तिला राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडरही बनवले आहे. जी त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तिने मुंबई (Mumbai) ते कन्याकुमारी बाईकवर प्रवास केला आहे, आज त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: 'हडफडे अग्नितांडव, पर्यावरण विषयांवर सरकारला घेरणार'! विरोधी आमदारांची रणनीती; महसुलाचा कणाच मोडल्याचा आरोप

Ferdino Rebello: ‘गोव्याच्या प्रजेचा आवाज’ कडाडला! न्‍या. रिबेलो यांच्‍या हाकेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; सभेत केल्या 3 मागण्या Watch Video

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

SCROLL FOR NEXT