Crmie News  Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: अर्धनग्न अवस्थेत आढळली तरुणी... होणाऱ्या नवऱ्याने केला घात!

Madhya Pradesh Crime: तरुणीचा ज्याच्याबरोबर साखरपुढा झाला होता त्यानेच तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: इंदूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील रावजी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचा ज्याच्याबरोबर साखरपुढा झाला होता त्यानेच तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे. कोणीही घाबरुन जाईल अशा अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणी अर्धनग्न होती. तिच्या गळ्यात कात्री अडकली होती आणि हाताच्या आणि पोटाच्या शिराही पूर्णपणे हिरव्या झाल्या होत्या.

दरम्यान, आरोपी सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, खोलीत तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता घरभर रक्त दिसले. तरुणीच्या गळ्यात कात्री अडकल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

एक रुम भाड्याने घेतली होती

घरमालकाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक तरुण आणि एक तरुणी या घरात राहायला आले होते. दोघांनी ही खोली भाड्याने घेतली होती. तरुणाने पीडितेबरोबर काही दिवसांतच लग्न होणार असल्याचे सांगितले होते. पीडिता मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रावजी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबर कॉलनीत घडली. शनिवारी सकाळी घरमालक भाडे वसुलीसाठी गेले असता तरुणीचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

लग्नावरुन वाद झाला

दुसरीकडे, या दोघांमध्ये लग्नावरुन वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हा करण्यापूर्वी आरोपीने तरुणीसोबत बसून जेवणही केले होते. पोलिसांना घटनास्थळावरुन खाद्यपदार्थांचे बॉक्सही सापडले. जेवताना दोघांमध्ये काही वाद झाला असावा, यानंतर आरोपीने रागाच्या भरात तरुणीवर कात्रीने वार करुन तिची हत्या केली असावी असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फरार आरोपीने पीडितेसाठी जेवण आणले होते, त्या खोलीत जेवणाचे डब्बे अस्थावेस्थ अवस्थेत पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. पोलिसांना पीडितेच्या खोलीतून एक ओळखपत्र सापडले असून त्यामध्ये तिचा पत्ता सागर येथील असल्याचे दिसते. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. हे दोघेही 15 दिवसांपूर्वीच या परिसरात राहायला आले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT