giriraj singh
giriraj singh  dainik gomantak
देश

Lok Sabha Elections 2024: ‘’त्यांना भारतात पुन्हा 1947 ची परिस्थिती निर्माण करायची...’’: गिरीराज सिंह यांचा ओवेसी यांच्यावर हल्लाबोल

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024: देशात आज लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यातील मतदान (शनिवारी) पार पडत आहे. यादरम्यान, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ओवेसी शनिवारी बिहारमध्ये पोहोचले होते, त्यांच्या दौऱ्यानंतर गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी मीडियाशी बोलताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सिंह म्हणाले की, ‘’असदुद्दीन ओवेसी हे असे नेते आहेत, ज्यांना भारतात पुन्हा एकदा फाळणीसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. ते असे नेते आहेत, ज्यांचे बंधू 15 मिनिटांत हिंदूंचा नाश करु असे म्हणातात. ते असेही नेते आहेत, जे राष्ट्रगीताच्या वेळी कधीच उपस्थित राहत नसतात. बिहारमध्ये त्यांना विरोध व्हायला हवा.’’ दुसरीकडे, बिहारमध्ये पोहोचल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की नाही हे जनताच ठरवेल.’

दरम्यान, शनिवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा चांगलाच समाचार घेतला. ओवेसींवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘त्यांना देशात पु्न्हा एकदा 1947 ची निर्माण करायची आहे.’ पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना गिरिराज सिंह यांना ओवेसींच्या बिहार दौऱ्याबाबत विचारले असता, ओवेसी नव्हे तर जिनांचा जिन आल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, असदुद्दीन ओवेसी आज बिहार दौऱ्यावर पाटणा येथे पोहोचले, ते काराकाटमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. या जागेवर ओवेसी यांनी अत्यंत मागास जातीतून आलेल्या प्रियंका चौधरी यांना आपल्या पक्षाचे तिकिट दिले आहे. या जागेवर एनडीएकडून उपेंद्र कुशवाह आणि इंडिया अलायन्सकडून राजाराम सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी, भोजपुरी स्टार पवन सिंग अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. बिहार दौऱ्यावर पाटणा येथे पोहोचताना ओवेसींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ‘भाजपला 400 जागा द्या, मुस्लिम आरक्षण संपुष्टात येईल’ या अमित शाह यांच्या वक्तव्यावर ओवेसी म्हणाले की, ‘आरक्षणासोबतच ते संविधानही रद्द करतील, हा त्यांचा हेतू उद्देश आहे.’

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत.' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुस्लिम आरक्षणावरील वक्तव्यावर ते म्हणाले की, 'ते (अमित शाह) सर्वांचे आरक्षण संपवतील. ते संविधानही रद्द करतील.' दुसरीकडे, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या बिहार दौऱ्यावर LJP प्रमुख चिराग पासवान म्हणाले की, ‘ते (असदुद्दीन ओवेसी) इंडिया आघाडीचे नुकसान करतील. एवढ्या कडक उन्हात आज पंतप्रधानांची सभा झाली. सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. 400 पारचा आकडा गाठण्यासाठी आम्हाला (एनडीए) आता कोणीही रोखू शकत नाही.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT