Ghulam Nabi Azad Dainik Gomantak
देश

Ghulam Nabi Azad यांच्या पक्षाला ग्रहणं, माजी मंत्र्यांसह तीन ज्येष्ठ नेत्यांची हकालपट्टी

Ghulam Nabi Azad: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला.

दैनिक गोमन्तक

Ghulam Nabi Azad: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला. मात्र आता, आझाद यांनी गुरुवारी माजी मंत्री तारा चंद यांच्यासह तीन ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या 'डेमोक्रॅटिक आझाद पार्टी' मधून हकालपट्टी केलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री तारा चंद आणि मनोहर लाल आणि माजी आमदार बलवान सिंह यांचा समावेश आहे.

दरम्यान, डीएपीचे सरचिटणीस आर.एस. छिब यांनी त्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश जारी केला. छिब यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, "पक्षविरोधी कारवायांसाठी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आझाद यांना खात्री होती की, ते पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याने त्यांची पक्षाला गरज नाही.” सुमारे तीन महिन्यांपूर्वी पक्षाची स्थापना करणारे डीएपी अध्यक्ष आझाद यांनी गेल्या दोन वर्षांत संघटनेत अनेक नियुक्त्या केल्या आहेत.

दुसरीकडे, काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. आझाद यांनी काँग्रेस सोडल्यावर इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद (59) यांनी माजी मंत्री आणि माजी आमदारांसह इतर 60 हून अधिक कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तारा चंद हे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख दलित चेहरा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT