Raman Raja Khanna Dainik Gomantak
देश

Success Story: बँकेतली PO ची नोकरी सोडून बनले 'शिक्षक', पती-पत्नीनं साकारलं...

Success Story: विद्या विनयेन शोभते, असे म्हणतात. लहानपणापासूनचं शिक्षणाची आवड असणाऱ्या रमण राजा खन्ना यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य काम केले.

Manish Jadhav

Success Story: विद्या विनयेन शोभते, असे म्हणतात. लहानपणापासूनचं शिक्षणाची आवड असणाऱ्या रमण राजा खन्ना यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य काम केले.

आजच्या काळात रमण राजा खन्ना हे शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. आज डझनभर शाळा, हजारो मुले आणि स्टॉफ... इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास संघर्षमय राहिला आहे.

रमण हे बँकेत पीओ म्हणून काम करायचे, परंतु त्यांना नेहमी असे वाटायचे की, ते नोकरीसाठी बनवले नाहीत.

रमण सांगतात की, जेव्हा ते 9 वीत होते तेव्हा ते 8 वीतील मुलांना शिकवत असे, जेव्हा ते 11वीत गेले तेव्हा ते 10 वीच्या मुलांना शिकवायचे. अध्यापनाची आवड पहिल्यापासूनच होती. मी आणि माझी पत्नी दोन खोल्यांच्या शाळेतून शिक्षण क्षेत्रात उतरलो.

त्या छोट्या खोल्यांसोबत एक छोटेसे कार्यालयही होते. जिथे माझी पत्नी बसून मुलांचे अ‍ॅडमिशन घेत असे. खोली खूपचं लहान आणि जुनी होती, त्यावेळी आमच्याकडे तिची डागडुजी करण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. तो काळ आर्थिक संकटाचा होता.

पावसाळ्यात खोलीत पाणी भरायचे. परंतु आम्ही हार न मानता विद्यादानाचे कार्य करत राहिलो. हळूहळू आम्ही प्रगती करत गेलो आणि आज 20 शाळांपर्यंत (School) पोहोचलो आहोत. जिथे हजारो मुले शिकतात. त्यांची पत्नी दिल्लीतील शाळेचा कारभार पाहते आणि गाझियाबादमधील शाळा ते स्वतः सांभाळतात.

अभ्यास हे प्रत्येक समस्येचे उत्तर आहे

रमण यांनी पुढे सांगितले की, घरात नेहमी अभ्यासाचे वातावरण होते. हरियाणातील अंबाला येथून शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी दिल्लीतून उच्च शिक्षण घेतले.

कुटुंबात आई-वडील शिक्षणावर (Education) खूप भर द्यायचे, वडील म्हणायचे की, माझ्या मुलांनी चांगला अभ्यास केला तर ती माझी सर्वात मोठी संपत्ती असेल. आज रमण आपल्या शाळेत मुलांना शिक्षणासोबत नैतिक मूल्येही शिकवत आहेत.

रमण सांगतात की, शाळेतील शिक्षणासोबतच मुलांना नैतिक मूल्यांचे धडे देणेही महत्त्वाचे आहे, कारण मुलांमध्ये भावनिक स्थिरता असेल तर ते जीवनातील कोणत्याही आव्हानावर विचलित न होता मात करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Horoscope: बुधादित्य योग! 'या' राशींना होणार मोठा फायदा; धन प्राप्तीसाठी उत्तम वेळ

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

'या गुन्ह्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालीय, जेनिटोला जामीन देऊ नका'; 'रामा'ची ठाम भूमिका

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

SCROLL FOR NEXT