CDS Anil Chauhan
CDS Anil Chauhan  Dainik Gomantak
देश

CDS Anil Chauhan यांच्याबद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

दैनिक गोमन्तक

New CDS: देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी सीडीएस पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर ते दुसरे सीडीएस बनले आहेत. 40 वर्षे लष्करात सेवा बजावलेले अनिल चौहान गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते.

देशाचे दुसरे सीडीएस बनले

त्यांच्यासमोर सशस्त्र दलांच्या तीन विंग म्हणजे हवाई दल, लष्कर आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आणि महत्त्वाकांक्षी थिएटर कमांडची निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन सैन्याला भविष्यातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज करता येईल. जनरल चौहान हे भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख राहिले आहेत.

दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्या निधनानंतर तब्बल महिन्यांनी जनरल चौहान यांनी वरिष्ठ लष्करी कमांडरची जबाबदारी स्वीकारली आहे. 4-स्टार रँकसह निवृत्तीनंतर सेवेत परतणारे ते पहिले सेवानिवृत्त अधिकारी ठरले आहेत.

जनरल चौहान म्हणाले, 'भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारताना मला अभिमान वाटत आहे. मी लष्कराच्या तिन्ही विंगच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाईन.'' सीडीएसचा पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल चौहान यांनी इंडिया गेट येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचे वडील सुरेंद्र सिंह चौहान हेही उपस्थित होते. रायसीना हिल्सवरील साऊथ ब्लॉकच्या लॉनवर तिन्ही सैन्याने जनरल चौहान यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी आणि नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरमाडे उपस्थित होते. जनरल चौहान यांच्या पत्नी अनुपमाही त्यांच्यासोबत होत्या. पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये संघर्ष सुरु असताना चीनशी संबंधित बाबींचे तज्ञ मानले जाणारे जनरल चौहान यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT