Geetansh Goyal from Bathinda, Punjab, set a world record by reciting Hanuman Chalisa in 1 minute and 35 seconds.  Dainik Gomantak
देश

जय हनुमान ज्ञान गुण सागर...! अवघ्या दीड मिनिटात हनुमान चालीसा म्हणत चिमुकल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा व्हिडिओ

Ashutosh Masgaunde

Geetansh Goyal from Bathinda, Punjab, set a world record by reciting Hanuman Chalisa in 1 minute and 35 seconds:

पंजाबच्या भटिंडा येथील गीतांश गोयल या 4 वर्षाच्या मुलाने विक्रमी वेळेत हनुमान चालिसाचे पठण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला असून, राष्ट्रपती भवनाने त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे.

४ वर्षे आणि तीन महिन्यांच्या गीतांशने १ मिनिट 35 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण करून हा रेकॉर्ड केला.

यासह गीतांशने यावेळी त्याचाच यापूर्वीचा १ मिनिट 54 सेकंदाज हनुमान चालिसा पठण करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात गीतांश गोयलचा सन्मान करण्यात येणार आहे.

यामुळे गीतांशचे कुटुंबीय खूप खूश आहेत. गीतांशच्या पालकांनी सांगितले की, "ज्यांना आम्ही वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेलमध्ये पाहतो त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रत्यक्षात भेटायची संधी आली आहे. ज्याच्यामुळे आम्हाला संधी मिळत आहे त्या आमच्या मुलाचा अभिमान आहे."

याआधी 2018 मध्ये हजारीबाग येथील एका 5 वर्षांच्या मुलाने 1 मिनिट 55 सेकंदात हनुमान चालीसा पठण करण्याचा रेकॉर्ड केला होता.

मात्र गीतांशने 1 मिनिट 54 सेकंदात हनुमान चालिसा पठण करून युवराजचा रेकॉर्ड मोडला होता. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते.

आता गितांशने आपलाच आधीचा रेकॉर्ड मोडत नवी कामगिरी केली आहे.

गीतांशचे वडील डॉ. विपिन गोयल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “काल आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला. त्यांनी सांगितले की, आम्हाला एक मेल पाठवण्यात आला आहे आणि त्यामध्ये राष्ट्रपतींना भेटण्याची अधिकृत पत्रिका पाठवली आहे.

“आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या मुलाने ४ वर्षे ३ महिन्याच्या वयाच्या हनुमान चालिसाचे पठण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला.” असे ते, पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT