Gautam Adani Dainik Gomantak
देश

Gautam Adani on Odisha Accident : ओडिशा दुर्घटनेनंतर गौतम अदाणी यांचा मोठा निर्णय; अदाणी समूह करणार हे काम...

Coromandel Express Accident: बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गौतम अदानी यांनी उचलण्याची घोषणा केली आहे.

Ashutosh Masgaunde

Gautam Adani Comes forward to help Victims of Odisha Tragedy

ओडिशातील बालासोर ट्रेन दुर्घटनेत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

गौतम अदानी यांनी ट्विट केले आहे की, ट्रेन दुर्घटनेमुळे आम्ही सर्वजण अतिशय दुःखी आहोत. या दुर्घटनेत ज्यांनी आपले आई-वडील गमावले आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च अदानी समूह उचलणार असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताची चौकशी केली जात आहे. ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 800 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सिग्नल बिघाडाचे हे संभाव्य कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सरकारने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विट केले आहे की, ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही सर्वजण अतिशय दुःखी आहोत. या दुर्घटनेत ज्या निरपराधांचे आई-वडील गमावले आहेत, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले उद्या देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.

बालासोर रेल्वे अपघातामुळे या मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेने जवळपास 90 गाड्या रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामध्ये नवी दिल्ली-पुरी पुरुषोत्तम एक्स्प्रेस आणि आनंद विहार टर्मिनल-पुरी निलांचल एक्स्प्रेसचा समावेश आहे. रद्द झालेल्या १९ गाड्यांमध्ये दक्षिणेकडील अनेक गाड्यांचाही समावेश आहे.

अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य कथन केले. एका प्रवाशाने सांगितले की, आरक्षित श्रेणी असूनही डबे खच्चून भरलेले होते. ट्रेन उलटली, त्यावेळी प्रवासी झोपले होते.

त्याने पुढे सांगितले की, अचानक एक धक्का बसला, डोळे उघडले आणि त्यानंतर किमान 15 लोक त्याच्या अंगावर पडले. कसातरी जीव वाचवून बाहेर आल्याचे प्रवाशाने सांगितले. त्यांनी पाहिले की काहींना हात नाहीत, काहींना पाय नाहीत आणि काहींचे चेहरे खराब झाले आहेत. प्रवाशाने पुढे सांगितले की, त्याला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला.

अपघाताबद्दल बोलताना ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने सांगितले की, संध्याकाळी 6.55 च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि त्यानंतर ट्रेन उलटली. तेंव्हा काही समजले तेव्हा ट्रेनचा अपघात झाला होता. तात्काळ रुग्णवाहिका आणि बचाव दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यामुळे आम्हाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवता आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT