Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: दुसऱ्याशी केलं लग्न, 23 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर 8 मित्रांसह प्रियकराचा सामूहिक बलात्कार

Madhya Pradesh Crime: इंदूरमधील द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरात 23 वर्षीय तरुणीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: इंदूरमधील द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरात 23 वर्षीय तरुणीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या जुन्या प्रियकराने त्याच्या साथीदारांसोबत तिचे अपहरण करुन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीने 4 वर्षांपूर्वी दुसऱ्याशी लग्न केल्याने आरोपीला राग आला होता आणि त्याला त्याचाच बदला घ्यायचा होता.

अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी सांगितले की, पीडित तरुणीने द्वारकापुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिने तक्रारीत म्हटले की, या भागात राहणाऱ्या अंकितने सहा महिन्यांपूर्वी तिचे अपहरण केले आणि एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान त्याने तोंड बंद ठेवण्याची आणि कोणाला काही सांगितले तर बहिणीशीही असेच केले जाईल, अशी धमकी दिली होती. मात्र, आता पीडितेने आपला त्रास पोलिसांना सांगितल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी अंकित कदम आणि पीडित तरुणी दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र दोघांचे लग्न होऊ शकले नाही. चार वर्षांपूर्वी पीडितेचे दुसऱ्याशी लग्न झाले. यामुळे अंकित कदम चांगलाच संतापला आणि त्याने अनेकवेळा पीडितेशी संपर्क साधून तिला भेटण्यास सांगितले होते. मात्र पीडितेला अंकितला भेटायचे नव्हते. मात्र, अंकित तिच्यावर सतत दबाव टाकत होता.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, पीडितेला एक मूलही आहे. काही दिवसांपूर्वी ती कर्जाचे पैसे जमा करण्यासाठी घरातून बँकेत जात होती. यादरम्यान तिला एकटीला गाठून अंकितने अपहरण केले. अंकितने तिला एका निर्जनस्थळी नेले आणि मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी पीडितेचे हात-पाय बांधले होते आणि तिच्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओही बनवला होता. अंकित कदम, विशाल, मिथुन, रवी बंजारा अशी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT