Agriculture News Dainik Gomantak
देश

Agriculture News: 'या' राज्यात शेतकऱ्यांना होतोय मोफत बियाणांचा पुरवठा, वाचा सविस्तर

सुधारित वाणांचे बियाणे खूप महाग असल्याने ते खरेदी करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात नसते.

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture News: भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बहुतांश जनता उत्पन्नाकरिता हि शेती, बागायतीवर अवलंबून आहेत.

शेती करत असताना चांगल्या प्रकारचे बियाणे असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणं गरजेचं असतं.

परंतु सध्या बाजारात सुधारित वाणांचे बियाणे खूप महाग आहे. ते बियाणे खरेदी करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात नसते. म्हणून विविध राज्यातील सरकारकडून या बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.

राजस्थान सरकारकडून यात पुढाकार घेतला गेला असून शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहेत. यासाठी राजस्थान सरकारने किसान साथी योजना आणि मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना सुरु केली आहे.

ही योजना कुणासाठी लाभदायक?

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील SC, ST, अल्प आणि अत्यल्प, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्‍यांना प्राधान्याने बियाणांचे मिनी किट वितरित केले जाते. शेतकरी कुटुंबातील महिला सदस्याला राज्य सरकारकडून बियाणांचे स्वतंत्र मिनी किट देण्याची तरतूद आहे.

मोफत बियाणे:-

या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे वितरित केले जातात. जेणेकरुन त्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकेल. मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, कृषी विभाग 30 ते 50 शेतकऱ्यांचे गट तयार करत आहेत. जेणेकरुन ते परस्पर सहकार्याने शेती करु शकतील.

50 टक्के अनुदान:-

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदानावर बियाणांचा पुरवठा केला जातोय.

राजस्थान सरकार केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे मिनी किट पुरवते. या योजनांमध्ये राष्ट्रीय तेलबिया आणि तेल पाम मिशन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT