France nationals residing in the union territory of Puducherry vote  ANI
देश

फ्रान्समध्ये निवडणुका, भारतात मतदान! हे कसं झालं शक्य?

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील 4,564 फ्रेंच नागरिकांनी मतदान केले.

दैनिक गोमन्तक

पुद्दुचेरी: फ्रान्समध्ये होतं असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (France nationals residing) आज फ्रेंच नागरिकांनी भारतात मतदान केले. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ते खरं आहे. पुद्दुचेरी (Puducherry) या केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या फ्रान्सच्या नागरिकांनी रविवारी त्यांच्या देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत मतदान केले. मिळालेल्या माहितीनुसार फ्रेंच राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील 4,564 फ्रेंच नागरिकांनी मतदान केले.

आता भारतात राहुन हे कसे शक्य? तर याला कारण म्हणजे, पुद्दुचेरी ही पूर्वी फ्रेंच वसाहत होती. एका प्रकाशनानुसार, "फ्रान्स आपल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि मतदार यादीत नोंदणी केलेल्या नागरिकांना ते राहत असलेल्या देशात मतदान करण्याचा अधिकार देतो." त्यानुसार पुद्दुचेरी प्रदेशातील फ्रान्सच्या महावाणिज्य दूतावासाच्या आवारात दोन आणि कराईकल आणि चेन्नई येथे प्रत्येकी एक मतदान केंद्रं स्थापन करण्यात आली होती. एका 20 वर्षीय मतदाराने पीटीआयला सांगितले की ती पुद्दुचेरी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात शिकत आहे आणि पहिल्यांदाच तिचा मताधिकार वापरत आहे.

फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी रविवारी मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवाराला पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर 24 एप्रिल रोजी आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सुमारे 4.8 कोटी लोकसंख्या या सर्वोच्च पदासाठी 12 उमेदवारांपैकी एकाची निवड करेल. विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दुसर्‍या टर्मसाठी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासमोर मारिन ले पेन यांचे कठीण आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT