Former Prime Minister Dr Manmohan Singh Dainik Gomantak
देश

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये केले दाखल

एम्स डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक मेडिकल बोर्ड बनवत आहे, ज्याचे नेतृत्व एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (89)) (Former Prime Minister Dr. Manmohan Singh) यांची प्रकृती बुधवारी खलावली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (AIIMS) च्या कार्डियो टावरमध्ये दाखल करण्यात आले. डॉ.नितीश नायक (Dr. Nitish Nayak) यांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ट्रिटमेंट करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, तसेच त्यांना चेस्ट कंजेशनची तक्रारही जाणवत आहे. एम्स डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक मेडिकल बोर्ड बनवत आहे, ज्याचे नेतृत्व एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) करणार आहेत. गेल्या महिन्यात 26 सप्टेंबरला मनमोहन सिंग 89 वर्षांचे झाले आहेत.

गेल्या वर्षी एम्समध्ये दाखल झाले होते

मनमोहन सिंग, जे 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते. त्यांना या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्जही देण्यात आला. मनमोहन सिंग यांनाही शुगरचा त्रास आहे. तसेच त्यांची दोनवेळा बायपास शस्त्रक्रिया देखील झाली आहे. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली, तर दुसरी बायपास शस्त्रक्रिया 2009 मध्ये एम्समध्ये करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

गेल्या महिन्यात प्रणव दा यांच्यावर आधारित भाषण दिले

एक महिन्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी प्रथम प्रणव मुखर्जी स्मारक व्याख्यानमालेत भाषण दिले, ज्यात त्यांनी त्यांचे कॅबिनेट सहकारी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले होते की, प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना भारताचे सर्वोच्च घटनात्मक पद मिळवण्यापूर्वी 5 दशकांहून अधिक काळाची प्रदीर्घ राजकिय कारकीर्द राहीलेली आहे. ते काँग्रेस पक्षाच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT