Former Mizoram Ranji cricketer K Lalremruata death Dainik Gomantak
देश

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Former Mizoram Ranji Cricketer K Lalremruata Death: मिझोरमचा माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआटा (K Lalremruata) याचा एका स्थानिक सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट क्षेत्रातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मिझोरमचा माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआटा (K Lalremruata) याचा एका स्थानिक सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अवघ्या ३८ व्या वर्षी लालरेमरुआटा याने जगाचा निरोप घेतल्याने मिझोरमच्या क्रीडा वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मैदानावरच कोसळला अन् जीव गमावला

मिझोरममध्ये 'खालिद मेमोरियल सेकंड डिव्हिजन स्क्रीनिंग' स्पर्धा सुरू होती. वेंगनुआई रेडर्स सीसी आणि चावंपुई ILMOV सीसी यांच्यात सामना रंगला होता. वेंगनुआई संघाकडून खेळताना लालरेमरुआटाला मैदानात अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो कोसळला.

त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

मिझोरम क्रिकेटचा एक आधारस्तंभ

१९८७ मध्ये जन्मलेल्या लालरेमरुआटा याने २०१८ मध्ये मिझोरमसाठी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने राज्यासाठी दोन रणजी सामने खेळले होते. तसेच ७ टी-२० सामन्यांमध्ये मिझोरमचे प्रतिनिधित्व करताना त्याने ८७ धावा केल्या होत्या, ज्यात नाबाद ४४ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती.

केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर क्रिकेट प्रशासनातही त्याचा मोठा वाटा होता. तो वरिष्ठ स्पर्धा समितीचे सक्रिय सदस्य म्हणून काम पाहत होता. त्यांच्या निधनानंतर स्पर्धेचे उर्वरित सर्व सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

मिझोरम क्रिकेट असोसिएशनने व्यक्त केला शोक

क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोरमने (CAM) अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून लालरेमरुआटा याला श्रद्धांजली वाहिली आहे. "मिझोरममध्ये क्रिकेट रुजवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लालरेमरुआटा यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक निष्ठावान खेळाडू आणि मार्गदर्शक गमावला आहे," अशा भावना असोसिएशनने व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना प्रकट केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

SCROLL FOR NEXT