Rahul Dravid and Rohit Sharma Dainik Gomantak
देश

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Rahul Dravid On Rohit Sharma: भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचे तोंडभरुन कौतुक केले.

Manish Jadhav

Rahul Dravid On Rohit Sharma: भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचे तोंडभरुन कौतुक केले. टी20 वर्ल्ड कप 2024 च्या विजयानंतर द्रविडने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्याने रोहितसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. रोहित शर्मा एक असा लीडर आहे, जो केवळ आपल्यासाठी नाही तर संघासाठी जगतो, असे गौरवपूर्ण उद्गार द्रविडने काढले.

‘रोहितची दृष्टी पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होती’

राहुल द्रविडने (Rahul Dravid) माजी भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनच्या ‘कुट्टी स्टोरीज’ या यूट्यूब चॅनेलवर मुलाखत दिली. यावेळी बोलताना तो म्हणाला की, रोहित शर्मा हा एक असा लीडर आहे, जो संघासाठी जगतो. तो पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होता. त्याला संघाला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे, याची पूर्ण कल्पना होती. त्याच्या या स्पष्टतेमुळे माझ्यासाठी त्याच्यासोबत जुळवून घेणे सोपे झाले. संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण सकारात्मक ठेवण्यावर रोहितने नेहमीच भर दिला, असंही द्रविड म्हणाला. ‘माझ्या मते संघाची वाटचाल कर्णधाराच्या दृष्टिकोनानुसारच व्हायला हवी आणि प्रशिक्षकाचे काम त्याला केवळ पाठिंबा देण्याचे आहे,’ असे मतही द्रविडने यावेळी व्यक्त केले.

अनुभव ही रोहितची सर्वात मोठी ताकद

या संवादात राहुल द्रविडने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुभवाचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला, ‘रोहितला खूप मोठा अनुभव आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे तो कठीण परिस्थितीत किंवा मोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला शांत ठेवण्यात यशस्वी होतो.’ रोहितने संघात असे वातावरण तयार केले होते, जिथे खेळाडू कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे खेळू शकतील, असा त्याचा प्रयत्न होता. ‘खेळाडूंनी बिनधास्त खेळावे’ ही त्याची साधी पण प्रभावी विचारसरणी होती, ज्यामुळे संघाने मोक्याच्या क्षणी उत्तम कामगिरी केली.

द्रविडने 2021 च्या शेवटी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्याच्या आणि रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने अनेक चढउतार पाहिले. यामध्ये आशिया कप, टी20 वर्ल्ड कप 2022 आणि 2023 वनडे वर्ल्ड कपमधील अपयशाचा समावेश आहे. पण तरीही दोघांनी एकजुटीने काम केले आणि अखेर 2024 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला तब्बल 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून दिला. हा विजय या दोघांच्याही मेहनतीचा आणि दूरदृष्टीचा परिणाम मानला जातो. याच विजयानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

द्रविडच्या या प्रतिक्रियांमुळे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नात्यातील विश्वास आणि सामंजस्य स्पष्टपणे दिसून येते. रोहित शर्माला मिळालेले हे कौतुक त्याच्या नेतृत्वाची खरी ओळख करुन देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

SCROLL FOR NEXT