Karpoori Thakur Dainik Gomantak
देश

Karpoori Thakur: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' जाहीर, जन्मशताब्दीपूर्वी घोषणा

Karpoori Thakur: बिहारचे समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Karpoori Thakur: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. 24 जानेवारीला त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्पूरी ठाकूर यांना मागासलेल्या लोकांचे 'मसिहा' म्हटले जाते. बुधवारी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोण होते कर्पूरी ठाकूर?

बिहारमधील समस्तीपूर येथे जन्मलेले कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांची ख्याती होती. त्यांनी मुंगेरी लाला आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्यासाठी त्यांना आपल्या सरकारचाही बळी द्यावा लागला होता. याशिवाय, त्यांनी बिहारच्या शिक्षण पद्धतीतही अनेक मूलभूत बदल केले होते. मॅट्रिकच्या परीक्षेत इंग्रजी उत्तीर्ण होण्याची अट त्यांनी रद्द केली होती. कर्पूरी ठाकर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री राहिले. विशेष म्हणजे, ते बिहारचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री होते. 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली होती. जयप्रकाश नारायण यांना ते आपला आदर्श मानत. 1970 मध्ये सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती. त्यांनी उर्दूला दुसरी राजभाषा म्हणून दर्जा दिला होता.

बिहारमध्ये पहिल्यांदाच दारुबंदी लागू करण्यात आली

कर्पूरी ठाकूर हे बिहारमध्ये प्रथमच दारुबंदी लागू करण्यासाठी देखील ओळखले जातात. त्याचबरोबर ते त्यांच्या साधेपणासाठीही ओळखले जात होते. कर्पूरी ठाकूर यांचे 17 फेब्रुवारी 1988 रोजी निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT