Former Australian Cricketer Bob Simpson Dies Dainik Gomantak
देश

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

Former Australian Cricketer Bob Simpson Dies At 89: ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचे निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेण्यात सिम्पसन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Sameer Amunekar

Former Australian Cricketer Bob Simpson Dies At 89

ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू बॉब सिम्पसन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक होते. नंतर ते ऑस्ट्रेलियाचे पूर्णवेळ प्रशिक्षकही बनले आणि त्यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने यशाचे नवे विक्रम रचले.

१९८६ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्याच्या सर्वात वाईट काळातून जात होता. त्यानंतर बॉब सिम्पसन ऑस्ट्रेलियन संघात सामील झाले आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघ पूर्णपणे बदलला. त्यांनी कर्णधार अॅलन बॉर्डरसोबत कठोर परिश्रम केले आणि तरुण खेळाडूंना संघात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळाडूंमध्ये डेव्हिड बून, डीन जोन्स, स्टीव्ह वॉ, क्रेग मॅकडर्मॉट आणि मर्व्ह ह्यूजेस यांचा समावेश होता.

पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला

बॉब सिम्पसनने १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी हे पद सोडले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाने पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद जिंकले.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. त्यानंतर १९८९ मध्ये ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकाही जिंकली.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करत बॉब सिम्पसन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.

बॉब सिम्पसनचा खेळाडू म्हणूनही रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी १९५७ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर ६२ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४८६९ धावा केल्या, ज्यामध्ये १० शतके आणि २७ अर्धशतके होती. त्याने कर्णधार म्हणून सर्व शतके केली. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना १९७८ मध्ये खेळला. त्याच वेळी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २१०२९ धावा आहेत.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT